ऑस्ट्रेलिया संघ सध्या येत्या काही दिवसांमध्ये भारतात दाखल होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांत्याच चार सामन्यांची कसोटी मालिका फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात खेळवली जाणार आहे. उभय संघांतील या कसोटी मालिकेसाठी चाहत्यांसह संघातील युवा खेळाडू देखील उत्सुक आहेत. ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज लान्स मॉरिस याला देखील या मालिकेसाठी निवडले गेले आहे आणि तो भारतीय खेळपट्टीवर खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Test Series) यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेर्बुरावीपासून नागपूरमध्ये सुरू होईल. कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या 18 सदस्यीय ऑस्ट्रेलिया संघात लान्स मॉरिस (Lance Morris ) याला निवडले गेले आहे. 24 वर्षीय मॉरिसला सिडनीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, तसे होऊ शकले नाही. अशात आता भारताविरुद्ध मॉरिस त्याचे कसोटी पदार्पण करण्याची पूर्ण शक्यता आहे. मॉरिसच्या मते भारतीय केळपट्टीवर वेगवान गोलंदाजीसाठी प्रतिकूल असू शकते. पण याठिकाणी गोलंदाजी करणे म्हणजे शिकण्यासाठी चांगली संधी आणि एक आव्हान असेल, असेही मॉरिसला वाटते.
माध्यमांशी बोलताना लान्स मॉरिस म्हणाला की, “इमानदारीने सांगायचे तर प्रतिक्रिया (भारतीय खेळपट्टीविषयी) खूप चांगल्या नाहीत.” सोमवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये ‘ब्रॅडमन यंग क्रिकेटर ऑफ द ईयर’ पुरस्काराचा मानकरी लांस मॉरिस याला मिळाला. भारतात खेळण्याविषयी मॉरिस म्हणाला, “भारतात मला चेंडू वेगात यष्टीरक्षकाच्या हातात जाताना दिसणार नाही. अशा खूप गोष्टी आहेत, ज्यासाठी मी उत्सुक नाहीये. भारत दौरा थोडा आव्हानात्मक असेल, असे वाटत आहे. पण तरीही हे रोमांचक असेल.”
“अनुभवी खेळाडूंसोबत खेळणे आणि भारतीय खेळपट्टीवर गोलंदाजी करायला शिकणे, यापेक्षा जास्त काहीच अपेक्षा नाहीये. आमच्या संघात काही दिग्गज खेळाडू आहे आणि खरोखर एक अनुभवी संघ आहे. सराव सत्रात त्यांच्याकडून काही शिकण्यासाठी मिळणे म्हणजे चांगले आहे. मला स्वतःकडून जास्त काही अपेक्षा नाहीत. मी या गोष्टी शिकण्याच्या आणि अनुभव घेण्याच्या दृष्टीने पाहत आहे. मी संघासोबत याआधीच कोणता दौरा केला नाहीये, त्यामुले हा माझा पहिला विदेश दौरा असेल. ही शिकण्यासाठी मला मिळालेली मोठी संधी असेल,” असेही मॉरिस पुढे म्हणाला.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाला चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेऐवजी भारताविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका देखील खेळायची आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघाचा धडाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव कसोटी पदार्पण करण्यासाठी तयार दिसत आहे. फॉर्ममध्ये असलेल्या सरफराज खानला वगळून निवडकर्त्यांनी सूर्यकुमारला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी (Border Gavaskar Trophy 2023) संघात सामील केले आहे. (Lance Morris reacts to Indian pitching ahead of India tour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या खेळपट्टीवर पंड्या भडकला, त्याबाबत कीवी अष्टपैलूचे मत वेगळे; म्हणाला, ‘आम्ही तक्रार करू…’
विश्वचषक विजेत्या संघातील ‘त्या’ चौघी करणार डब्लूपीएल लिलावात छप्परफाड कमाई; पाहा कामगिरी