पुणे। ग्रीनबॉक्स रिक्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित पाचव्या ग्रीनबॉक्स मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत द व्हेजिटेबल अँड कॉम्पिटेटिव्हस्पोर्ट्स लॅन्सर्स संघाने रोहन बिल्डर्स बायसन्स संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करत आगेकूच केली.
बावधन येथील गंगा लिजेंड्स फुटबॉल मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत नॅथन स्टीव्हन, निखिल माळी, विश्वजीत पराडकर यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर टीआरएनए इंडिया पॅलॅडियन्स संघाने गोयल गंगा ग्रुप ऍझटेक्सचा 3-2 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. अझहर खान(4,9मि.)याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर केएसएच बोल्ट्स संघाने गोल्डफिल्ड रेंजर्सला 4-1 असे पराभूत केले.
अन्य लढतीत रोहित मुलचंदानी, अभिनव विजयकुमार, शुभम फटघन यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर गनर्स संघाने वायकिंगस् संघावर 3-0अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला. विपुल त्रिवेदी(2,3मि.)याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर स्पार्टन्स संघाने सेंच्युरियन्स संघाला 4-1 असे नमविले. निओट्रीक रेझरबॅक्स संघाने फायरबर्डस संघाचा 1-0 असा सनसनाटी पराभव केला. विजयी संघाकडून अक्षय नायरने एक गोल केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
साखळी फेरी:
द व्हेजिटेबल अँड कॉम्पिटेटिव्हस्पोर्ट्स लॅन्सर्स: 3(स्वयंगोल रितेश तुबे 8मि., पृथ्वीराज सातव 12मि., धीरेन भतिजा 15मि.)वि.वि.रोहन बिल्डर्स बायसन्स: 2(स्वप्निल पवार 4मि., कार्तिक अय्यर 9मि.);
टीआरएनए इंडिया पॅलॅडियन्स: 3(नॅथन स्टीव्हन 2मि., निखिल माळी 5मि., विश्वजीत पराडकर 10मि.)वि.वि.गोयल गंगा ग्रुप ऍझटेक्स: 2(कौशल वालेचा 11मि., अनिकेत गुप्ता 14मि.);
निओट्रीक रेझरबॅक्स: 1(अक्षय नायर 7मि.)वि.वि.फायरबर्डस: 0;
पुनीत बालन स्पार्टन्स: 4(विपुल त्रिवेदी 2,3मि., शोएब सलमानी 8मि., सौरभ शिंदे 13मि.)वि.वि.हिलयॉस अँड क्लोरेस्टोल क्लिनिक्स सेंच्युरियन्स: 1(अमन फिलीप 6मि.);
चिताज नाईट्स: 3(जोएल दारास्वामी 6मि., रोहन देशमुख 8,11मि.)वि.वि.अभयराज शिरोळे अँड असोसिएट्स अँड कल्चर पुणे-समुराईज: 1(अनिरुद्ध चाको 5मि.);
युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स: 3(रोहित मुलचंदानी 3मि., अभिनव विजयकुमार 10मि., शुभम फटघन 13मि.)वि.वि.एसएस रॉय अँड असोसिएट्स वायकिंगस्: 0;
केएसएच बोल्ट्स: 4(अझहर खान 4,9मि., हुस्सेन सुर्ती 11मि., मोनीस शीख 12मि.)वि.वि.गोल्डफिल्ड रेंजर्स: 1(अक्रम पटेल 5मि.).