पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे अनोख्या व नाविन्यपूर्ण अशा पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत लॅन्सर्स् संघाने किर्रपन्स् संघाचा तर कुकरीज् संघाने एक्स्कॅलिबर्स् संघाचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत लॅन्सर्स् संघाने किर्रपन्स् संघाचा 12-7 असा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला. बॅडमिंटन प्रकारात लॅन्सर्स् संघाने किर्रपन्स् संघाचा 5-2 असा पराभव केला. टेबल टेनिस प्रकारात लॅन्सर्स् संघाने किर्रपन्स् संघाचा 4-3 असा पराभव करत आघाडी घेतली. टेनिस प्रकारात लॅन्सर्स् संघाने किर्रपन्स् संघाचा 3-2 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
दुस-या लढतीत कुकरीज् संघाने एक्स्कॅलिबर्स् संघाचा 10-09 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली. यामध्ये बॅडमिंटन प्रकारात कुकरीज् संघाने एक्स्कॅलिबर्स् संघाचा 6-1 असा पराभव करत सामन्यात आघाडी घेतली. टेबल टेनिस व टेनिस प्रकारात मात्र कुकरीज् संघाला पराभव पत्करावा लागला. टेबल टेनिस प्रकारात कुकरीज् संघाला एक्स्कॅलिबर्स् संघाने 2-5 अशी तर टेनिस प्रकारात 2-3 अशी मात दिली. पण आपली आघाडी कायम ठेवत कुकरीज् संघाने विजय मिळवला.
स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ.सुधीर भाटे आणि रिबाऊंड स्पोर्टस्चे संचालक आलोक तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तुषार नगरकर, अभिषेक ताम्हाणे, सारंग लागू, रणजित पांडे, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
लॅन्सर्स् वि.वि किर्रपन्स् 12-7
बॅडमिंटन- लॅन्सर्स् वि.वि किर्रपन्स् 5-2(सुमेध शहा/तेजस किंजीवडेकर पराभूत वि ईशान तळवळकर/मिहिर विंझे 29-30; अनिकेत शिंदे/ तुषार नगरकर पराभूत वि तन्मय चोभे/देवेंद्र चितळे 18-30; दिप्ती सरदेसाई/ रणजीत पांडे वि.वि चैत्राली नवरे/ विजय जाना 25-05; निखिल शहा/चिन्मय चिरकुटकर वि.वि अमित नाटेकर/राजशेखर करमरकर 25-15; आनंद घाटे/विमल हंसराज वि.वि अजिंक्य मुठे/ प्रिती सप्रे 25-10; समिर जालन/ विनायक भिडे वि.वि प्रतिक वांगीकर/सुदर्शन भिहाने 25-21; अभिजीत खानविलकर/ निरज दांडेकर वि.वि हर्षल गंद्रे/ रघुनंदन बेहारे 25-13)
टेबल टेनिस- लॅन्सर्स् वि.वि किर्रपन्स् 4-3(तुषार नगरकर/ रणजीत पांडे पराभूत वि आदित्यवर्धन त्रिमल/तन्मय चोभे 29-30; सुमेध शहा/निखिल शहा वि.वि अमित नाटेकर/देवेंद्र चितळे 30-27; नितिन सरदेसाई/ तेजस किंजीवाडेकर वि.वि हर्षल गंद्रे/ईशान तळवळकर 25-09; अमित धरना/विनायक भिडे पराभूत वि प्रियदर्शन डुंंब्रे/निलेश बजाज 16-25; अभिजीत मराठे/आनंद घाटे वि.वि प्रतिक वांगिकर/रघुनंदन बेहरे 25-15; ए. हळदणकर/ विमल हंसराज पराभूत वि सारंग पाबळकर/चैत्राली नवरे 08-25; कुणाल भुरत/समिर जालन वि.वि चैतन्य रहाटेकर/नंदन डोंगरे25-7)
टेनिस- लॅन्सर्स् वि.वि किर्रपन्स् 3-2(अभिजीत मराठे/रणजीत पांडे वि.वि अमित नाटेकर/प्रतिक वांगिकर 30-23; तुषार नगरकर/सुनिता रावळ पराभूत वि रघुनंदन बेहरे/सारंग पाबळकर 06-30; अव्दिक नाटेकर/ अश्विन हळदणकर वि.वि अजिंक्य मुठे/देवेंद्र चितळे 25-21; नितिन सरदेसाई/तेजस किंजीवाडेकर पराभूत वि प्रियदर्शन डुंब्रे/ईशान तळवळकर 24-25; अभिजित खानविलकर/अनहीता पांडे वि.वि तन्मय चोभे/स्नेहल देशपांडे 25-9).
कुकरीज् वि.वि एक्स्कॅलिबर्स् – 10-09
बॅडमिंटन-कुकरीज् वि.वि एक्स्कॅलिबर्स् 6-1(सिध्दार्थ निवसनकर/तेजस चितळे वि.वि महेश उदगीकर/सारंग अठवले 30-18; केदार केदार नादगोंडे/मकरंद चितळे वि.वि अवैत जोशी/ विक्रांत पाटील 30-28; प्रधान वानी/अदिती रोडे वि.वि मनोज बेहेडे/अनिल अगाशे 25-01; हर्षवर्धन आपटे/विनित रुकारे वि.वि सचिन जोशी/अभिषेक ताम्हाणे 25-15; अमर श्रोफ/अमोद प्रधान वि.वि आनंद शहा/ईशा पाठक 25-12; हरेश गलानी/शैलेश लिमये वि.वि मधुर इंगळहाळीकर/निखिल चितळे 25-22; प्रांजली नादगोंडे/सचिन अभ्यंकर पराभूत वि विक्रम ओगले/राजेंद्र कांगो 20-25);
टेबल टेनिस- कुकरीज् पराभूत वि एक्स्कॅलिबर्स् 2-5(हर्षवर्धन आपटे/सचिन अभ्यंकर पराभूत वि सचिन बेळगावकर/अभिषेक ताम्हाणे 07-30; शिरिष कर्णीक/सिध्दार्थ निवसकर पराभूत वि रुचा अंबीके/मधुर इंगळहाळीकर 16-30; सारंग पाटील/तन्मय चितळे पराभूत वि महेश उदगीकर/विक्रांत पाटील 20-25; शौलेश लिमये/किरण गार्गे पराभूत वि अभिषेक सोमन/आनंद शहा 15-25; मकरंद चितळे/प्रथम वाणी वि.वि ईशा पाठक/सचिन जोशी 25-20; अमोल प्रधान/ गौरव भगत पराभूत वि रोहन जेमेनीस/सिध्दार्थ मराठे 13-25; विनित रुकारी/केदार नादगोंडे वि.वि अव्दैत जोशी/ आशिष देसाई 25-10);
टेनिस- कुकरीज् पराभूत वि एक्स्कॅलिबर्स् 2-3(गौरव भगत/सतिश भगत पराभूत वि सिध्दार्थ मराठे/अभिषेक सोमन 26-30; मिहिर दिवेकर/सारंग देवी वि.वि राहूल मुथा/राजेंद्र कांगो 30-22; अभिजीत इंगळहाळीकर/हनिफ मेमोन 23-25; सचिन अभ्यंकर/सिध्दार्थ निवसकर वि.वि महेश उदगीकर/पराग टेपन 25-12; राहूल रोडे/केदार नादगोंडे पराभूत वि नेहा ताम्हाणे/रोहन जेमेनीस 12-25).