बुधवारी (२६ नोव्हेंबर) लंका प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वातील पहिला सामना कोलंबो किंग्ज अणि कॅंडी टस्कर्स यांच्यात खेळवण्यात आला. हंबनटोटा येथील मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलंबो किंग्ज संघाने सुपर ओव्हरमध्ये कॅंडी टस्कर्सवर विजय मिळवला. कॅंडी टस्कर्स संघाने प्रथम फलंदाजी करत ३ गडी गमावून, २१९ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर कोलंबो किंग्ज संघालाही २२० धावांचा पाठलाग करताना ७ गड्यांच्या मोबदल्यात २१९ धावा करता आल्या आणि सामन्यात बरोबरी झाली. यानंतर कोलंबो किंग्ज संघाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.
कोलंबो किंग्ज संघाचा कर्णधार एंजेलो मॅथ्यूजनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कॅंडी टस्कर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना सुरुवात चांगली केली. कुशल परेरा आणि रहमानुल्ला गुरबाज यांनी पहिल्या गड्यासाठी ३४ चेंडूत ७५ धावांची जबरदस्त भागीदारी केली.
गुरबाजने केवळ २२ चेंडूत ६ चौकार अणि ४ षटकार लगावत आक्रमक ५३ धावांची खेळी केली. त्याबरोबरच कुशल परेराने ५२ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि ४ चौकारांच्या मदतीने दमदार ८७ धावांची खेळी साकारली. त्याच्यानंतर कुशल मेंडिसने २४ चेंडूत ३० आणि गुनारत्ने २० चेंडूत नाबाद ३३ धावांची खेळी करून कॅंडी टस्कर्स संघाला एक मोठी धावसंख्या उभा करून दिली.
२२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या कोलंबो संघाला दिनेश चंडीमल आणि लौरी एवान्स यांनी ताबडतोब सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी ५.२ षटकात अर्धशतकी भागीदारी केली. यामधे भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने गोलंदाजी केली परंतु, तो खुप महागडा ठरला. त्याने १.५ षटकात २५ धावा दिल्या आणि दुखापतग्रस्त होवून बाहेर गेला.
कोलंबो किंग्ज संघासाठी दिनेश चंडीमलची दमदार खेळी केली.
दिनेश चंडीमलनी ४६ चेंडूत ८० धावा केल्या आणि आंद्रे रसेलनी १३ चेंडूत २४ धावांची खेळी केली. अंतिम टप्प्यात इसुरु उडाना याने फक्त १२ चेंडूत नाबाद ३४ धावांची आक्रमक खेळी करून सामना बरोबरी आणला. सुपर ओव्हरमध्ये कोलंबो किंग्ज संघाने एका षटकात १ विकेट गमावत १६ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना कॅंडी टस्कर्स संघाला १२ धावाच करता आल्या. या सामन्यात दिनेश चंडीमल याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ भारतीय वनडेतील सर्वात महान खेळाडू, ऍराॅन फिंचने थोपटली पाठ
‘या’ गोष्टीमुळे भारतीय संघात आत्मविश्वास; सिडनीत मागील पाचही वनडे सामन्याचा काय आहे निकाल पाहा
जाळ धूर संगटच ! कांगारूकडून भारतीय गोलंदाजांची मनसोक्त धुलाई