श्रीलंकेत होणारी ‘लंका प्रीमियर लीग’ ही स्पर्धा कोरोनामुळे तिसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. सुरुवातीला ही स्पर्धा 14 नोव्हेंबरला सुरू होणार होती. परंतु नंतर ही स्पर्धा 21 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता या स्पर्धेचे आयोजन 27 नोव्हेंबर ते 17 डिसेंबरदरम्यान हंबनटोटा येथे होईल.
कोरोनाचा कहर क्रिकेटवरही झाला असल्याचे पहायला मिळाले आहे. भारतातील ‘आयपीएल’ देखील पहिल्यांदाच सप्टेंबर महिन्यात भरविण्यात आली. त्याचप्रमाणे श्रीलंकेतील ‘एलपीएल’ स्पर्धा आता तिसऱ्यांदा स्थगित केली आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या ‘एलपीएल’ स्पर्धेत एकूण 23 सामने होणार आहेत. हे सर्व सामने हंबनटोटा या शहरातील स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय होणार आहेत. या स्पर्धेत श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूंव्यतिरिक्त ख्रिस गेल, फाफ डू प्लेसिस, शाहिद आफ्रिदी, कार्लोस ब्रेथवेट आणि इरफान पठाण सारखे मोठे खेळाडू देखील खेळणार आहेत.
श्रीलंका प्रशासनाने सांगितले की वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खेळाडूंना एक आठवडा क्वारंटाइन राहण्यासाठी परवानगी दिली आहे. तर संघाशी निगडित इतर लोक व कर्मचाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-ब्रेकिंग ! गौतम गंभीर सेल्फ आयसोलेट, स्वतः ट्विट करून दिली माहिती
-ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी कोहलीचे मोठे भाष्य, ‘या’ कारणामुळे दौरे मोठे नसावेत
-“वैयक्तिक कीर्तिमान महत्वाचे परंतु…”, दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमारची खास प्रतिक्रिया