मुंबई । इंडियन प्रीमियर लीगनंतर (आयपीएल) श्रीलंकेतील टी20 स्पर्धा लंका प्रीमियर लीग (एलपीएल) 14 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान होईल. या टी20 लीगमध्ये एकूण 5 संघ सहभागी होणार आहेत, ज्यात कोलंबो, कॅन्डी, गॉल, दांबुला आणि जाफना हे संघ असतील. एलपीएलच्या पहिल्या हंगामाचे सर्व सामने दांबुला, कॅन्डी आणि हंबनटोटो येथे खेळले जातील.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आपल्या क्रिकेटपटूंना परदेशी लीगमध्ये खेळू देत नाही, तथापि निवृत्तीनंतर खेळाडू परदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळू शकतात. म्हणूनच माजी भारतीय वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल आणि प्रवीण कुमार लंका प्रीमियर लीगमध्ये खेळू शकतील.
हे दोन्ही माजी वेगवान गोलंदाज निवृत्त झाले आहेत आणि बीसीसीआय अंतर्गत कोणतीही स्पर्धा खेळत नाहीत. युवराज सिंग आणि मनप्रीत गोनी या खेळाडूंनीही निवृत्ती घेतल्यानंतर परदेशी टी20 लीग खेळले आहेत. त्याचबरोबर मुनाफ पटेल गेल्या वर्षी टी10 लीग देखील खेळला होता.
इनोव्हेटिव्ह प्रॉडक्शन ग्रुपचे प्रमुख अनिल मोहन यांनी या लीगमध्ये मुनाफ आणि प्रवीण कुमार खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मोहन यांनी पार्क ऑब्सर्व्हर डॉट कॉमला सांगितले की, “आयपीएलनंतर बरेच खेळाडू या लीगमध्ये सामील होतील. एसएलसीकडून आम्हाला काही याद्या देण्यात आल्या आहेत, ज्यात असे म्हटले आहे की, माजी भारतीय वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल आणि प्रवीण कुमार यांनी एलपीएलमध्ये खेळण्यास सहमती दर्शविली आहे. अगदी पठाण बंधू (इरफान पठाण आणि युसुफ पठाण )देखील खेळू शकतात.”
त्याचबरोबर ख्रिस गेल, कॉलिन मुन्रो, मार्टिन गप्टील सारख्या अनेक परदेशी स्टार खेळाडू लंका प्रीमियर लीगमध्ये खेळू शकतात. विव्ह रिचर्ड्स, ब्रायन लारा, वसीम अक्रम आणि शोएब अख्तर यांच्यासारख्या दिग्गजांचे संघाला मार्गदर्शन मिळू शकते. आता ही मोठी नावे असलेली लंका प्रीमियर लीग यशस्वी होऊ शकते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले केकेआरच्या फिरकीपटूचे कौतुक म्हणतो, ‘त्याला खूप आत्मविश्वास आहे’
-डरना मना है! ‘आयपीएलमध्ये खेळणारे क्रिकेटर्स नाही घाबरणार कोरोना व्हायरसला’
ट्रेंडिंग लेख-
-या ३ कारणांमुळे आयपीएल २०२० चॅम्पियन बनणार किंग्ज इलेव्हन पंजाब संघ?
-अजूनही आयपीएल खेळत असते तर, हे ५ परदेशी खेळाडू झाले असते सुपर डुपर हिट
-मुछे हो तो नत्थूलाल जैसी अन् क्रिकेटर असावा तर लालाजींसारखा