वेलिंग्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतावर ८० धावांनी विजय मिळवला. ४३ चेंडूत ८४ धावा करणाऱ्या टीम सेफर्टला सामनावीर घोषीत करण्यात आले.
भारताकडून एमएस धोनी (३९), शिखर धवन (२९) आणि विजय शंकर (२७) यांनी थोडाफार प्रतिकार केला.
विशेष म्हणजे सामन्यातील ४ चेंडू बाकी असतानाच टीम इंडिया १३९ धावांवर सर्वबाद झाली.
यापुर्वी कधीही भारतीय संघ टी२० सामन्यात ५०पेक्षा अधिक धावांनी पराभूत झाला नव्हता. भारतीय संघाचा यामुळे हा टी२०मधील सर्वात मोठा पराभव ठरला.
भारतीय संघाचे टी२०मधील सर्वात मोठे पराभव-
८०- वेलिंग्टन, न्यूझीलंड, २०१९
४९- ब्रिजस्टोन, ऑस्ट्रेलिया, २०१०
४६- नागपुर, न्यूझीलंड, २०१६
महत्त्वाच्या बातम्या-
–वन-डे पाठोपाठ टी२०मध्येही सांगली एक्सप्रेस स्म्रीती मंधनाचा धडाका सुरूच…
–भाई-भाई: ‘पंड्या ब्रदर्स’ टीम इंडियाकडून एकत्र खेळणारी तिसरी भावांची जोडी…
–न्यूझीलंड-भारत टी२० मालिका हा संघ जिंकणार, जाणून घ्या कारण
–मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी या महिन्यातील ही आहे सर्वात मोठी खुशखबर