श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा या आठवड्यात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. याबद्दल श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने सोमवारी माहिती दिली आहे.
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश संघात तीन वनडे सामने अनुक्रमे 26, 28 आणि 31 जूलैला आर. प्रेमादासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहेत. या मालिकेसाठी मलिंगाचा श्रीलंकेच्या 22 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. पण तो या मालिकेतील पहिलाच सामना खेळून वनडेतून निवृत्ती घेणार आहे.
याबद्दल करुणारत्नेने सांगितले की ‘तो(मलिंगा) पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर तो निवृत्ती घेईल. त्याने हेच मला सांगितले आहे. मला माहित नाही त्याने निवड समीतीला काय सांगितले आहे पण मला तरी त्याने तो फक्त एक सामना खेळणार असल्याचे सांगितले आहे.’
35 वर्षीय मलिंगा हा वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने वनडेमध्ये 225 सामन्यात 29.02 च्या सरासरीने 335 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेकडून त्याच्यापेक्षा केवळ मुथय्या(523) मुरलीधरन आणि चांमिंडा वास(399) यांनी अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच मलिंगा हा विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या एकूण गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने विश्वचषकात एकूण 56 विकेट्स घेतल्या आहेत. यातील 13 विकेट्स त्याने नुकत्याच इंग्लंड आणि वेल्समध्ये पार पडलेल्या 2019 विश्वचषकात घेतल्या आहेत.
तसेच अचूक यॉर्कर टाकणारा गोलंदाज म्हणून ओळख मिळवलेल्या मलिंगाने 2011 मध्येच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो श्रीलंकेकडून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मुलाखत: फायनल खेळून ट्रॉफी जिंकावी हाच निर्धार – कर्णधार जोगिंदर नरवाल
–श्रीलंकेचा हा दिग्गज क्रिकेटपटू करणार टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज?
–या ५ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंनी चांद्रयान २ माहीमेसाठी केले इस्त्रोचे कौतुक