आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 ची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने त्यांनी श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याला गोलंदाजी प्रशिक्षक बनवले. मलिंगाने मुंबईसह खेळताना चार वेळा आयपीएल विजेतेपदे देखील पटकावली आहेत. तो राजस्थान रॉयल्सची साथ सोडून आता मुंबई इंडियन्समध्ये शेन बॉंड याची जागा घेईल.
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज असलेल्या मलिंगा याने 2019 मध्ये आयपीएलला रामराम केला होता. त्यानंतर 2022 मध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळली. मात्र, आता तो पुन्हा एकदा नव्या भूमिकेत मुंबई इंडियन्स संघात सामील झाला.
एका क्रिकेट संकेतस्थळांने दिलेल्या माहितीनुसार, मलिंगा मुंबई इंडियन्समध्ये आता शेन बॉंड याची जागा घेईल. बॉंड मागील नऊ वर्षापासून ही भूमिका बजावत होता. मलिंगाने आपल्या कारकिर्दीत मुंबई इंडियन्ससाठी खेळताना तब्बल 170 बळी मिळवले होते. सध्या मलिंगा मुंबई इंडियन्सचीच फ्रॅंचायजी असलेल्या एमआय न्यूयॉर्क संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक असून, या संघाने मेजर लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते.
मलिंगा मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफचा भाग झाल्यामुळे आता मुंबईच्या सर्वच मुख्य पदांवर दिग्गज खेळाडूंचा भरणा झालेला आहे. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रोहित शर्मा करेल. तर, मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर असेल. फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका कायरन पोलार्ड हा बजावणार आहे. श्रीलंकेचा दुसरा दिग्गज माहेला जयवर्धने या फ्रेंचायजीचा ग्लोबल हेड आहे. आतापर्यंत पाच आयपीएल विजेते जिंकलेल्या मुंबईला मागील तीन वर्षात एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही.
(Lasith Malinga Join Mumbai Indians As Bowling Coach Replace Shane Bond)
महत्त्वाच्या बातम्या-
‘ऋतुराजला नेट्समध्ये खेळताना पाहण्यासाठी पैसे देईल’, असे का म्हणाला दिग्गज अश्विन? लगेच वाचा
‘धाकड गर्ल’ अंतिम पंघलचे सोनेरी यश! सलग दुसऱ्यांदा बनली विश्वविजेती