पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने गुरुवारी (13 एप्रिल) आयपीएल 2023 मधील पहिला सामना खेळला. या सामन्यात त्याने चार षटकात 36 धावा खर्च करत 1 विकेट घेतली आणि आयपीएलमधील आपल्या 100 विकेट्स पूर्ण केल्या. श्रीलंका आणि मुंबई इंडियन्सचा माजी दिग्गज लसिथ मलिंगा याचा खास विक्रमही त्याने मोडीत काढला.
कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आता आयपीएल इतिहासात सर्वाद कमी सामन्यांमध्ये आपल्या 100 विकेट्स पूर्ण करणारा गोलंदाज ठरला आहे. त्यायने अवघ्या 64 सामन्यांमध्ये 100 आयपीएल विकेट्स घेतल्या. याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याच्या नावावर होता. मलिंगाने 70 सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेतल्या होत्या.
गुरुवारी पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 153 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने हे लक्ष्य 19.5 षटकात 4 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. गुजरातच्या डावातील 5व्या षटकात रबाडाने सलामीवीर रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याची विकेट घेतली. साहाने त्यावेळी 19 चेंडूत 30 धावा केल्या होत्या आणि खेळपट्टीवर सेट झाला होता. मात्र, रबाडाच्या शॉर्ट चेंडूवर त्याने पूल शॉट खेळला आणि डीप स्क्वेअर लेगवर मॅथ्यू शॉर्टच्या हातात झेलबाद झाला. याचसोबत आयपीएलमध्ये 100 विकेट्स घेणारा तो 21वा गोलंदाज बनला. विदेशी खेळांडूंच्या यादीत रबाडा पाचवा आहे, ज्याने 100 आयपीएल विकेट्स घेतल्या.
आयपीएलमध्ये सर्वात कमी सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेणारे खेळाडू
कगिसो रबाडा-64 सामने
लसिथ मलिंगा- 70 सामने
हर्षल पटेल- 79 सामने
भुवनेश्वर कुमार- 81 सामने
आईपीएलमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट्स गेणारे विदेशी खेळाडू
ड्वेन ब्रावो- 183 विकेट
लसिथ मलिंगा-100 विकेट
सुनील नरेन- 158 विकेट
राशिद खान- 121 विकेट
कगिसो रबाडा-100 विकेट
रबाडाने आयपीएलचा आपला पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सकडून 2017 मध्ये खेळला होता. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 64 सामन्यांमध्ये 19.8च्या सरासरीने 100 विकेट्स घेतल्या आहेत. येणाऱ्या काळात दक्षिण आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज आयपीेलमध्ये अनेक मोठे विक्रम देखील करू शकतो. (s biggest IPL record destroyed! Rabada’s great performance in the first match of the 2023 season)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“तो निःसंकोचपणे नंबर 1”, भारतीय दिग्गजाने बटलरवर उधळली स्तुतीसुमने
‘पर्पल कॅप होल्डर पुन्हा आलाय’, मोहितच्या कमबॅकने भारावले चाहते, ट्विटरवर प्रतिक्रियांचा महापूर