क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. या खेळात कुठल्या क्षणी काय घडेल आणि कुठला सामना कधी फिरेल हे सांगता येत नाही. एका सामन्यात शेवटच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता असताना, अनेकांना हेच वाटेल की, षटकार मारला की सामना जिंकणार आणि चौकार मारला तर सामना बरोबरीत सुटणार. परंतु चौकार आणि षटकार न मारता फलंदाजी संघाचा विजय झाला असे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसेल का? नाही ना? परंतु असा प्रकार घडला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा प्रकार एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत घडला. या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. सामन्याचा निकाल पाहण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत वाट पाहावी लागली होती. शेवटच्या चेंडूवर विजय मिळवण्यासाठी फलंदाजी करत असलेल्या संघाला ५ धावांची आवश्यकता होती. ही स्थिती पाहता क्रिकेटतज्ञ देखील हेच म्हणतील की, विजय मिळवण्यासाठी षटकार आणि सामना बरोबरीत आणण्यासाठी चौकाराची आवश्यकता आहे.
शेवटच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता असताना, फलंदाजाने ना चौकार मारला ना षटकार मारला. तरीदेखील फलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
Need 5 runs to win in the final ball and look what has happened, unbelievable.pic.twitter.com/eMveEc99MZ
— Johns. (@CricCrazyJohns) February 2, 2022
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, फलंदाजाने जो शॉट मारला तो थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला होता. जोपर्यंत क्षेत्ररक्षक तो चेंडू पकडणार इतक्यात दोन धावा पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर देखील फलंदाजाने तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि यादरम्यान क्षेत्ररक्षकाने मोठी चूक केली. त्याने फलंदाजाला धावबाद करण्यासाठी चेंडू यष्टिरक्षकाकडे फेकला. परंतु तो चेंडू यष्टिरक्षकाला देखील अडवता आला नाही. तो चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात होता. इतक्यात फलंदाजांनी धावत ५ धावा पूर्ण केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या :
धोनी-कोहलीवर नाही आली वेळ, पण रोहितला ‘या’ बड्या आव्हानाला जावं लागणार सामोरे