---Advertisement---

धोनी-कोहलीवर नाही आली वेळ, पण रोहितला ‘या’ बड्या आव्हानाला जावं लागणार सामोरे

On: मंगळवार, फेब्रुवारी 1, 2022 11:53 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने (Virat kohli) भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे कसोटी संघाचा पुढील दावेदार कोण यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच भारतीय एकदिवसीय आणि टी२० संघांचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माला(Rohit sharma) कसोटी कर्णधारपदाचा दावेदार म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जात आहे.

रोहित शर्माला कसोटी संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते, पण त्याच्या फिटनेस समस्येमुळे कर्णधार म्हणुन त्याच्या क्षमतेवर अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. आता या मुद्द्यावर भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज अजित अगरकर( Ajit agarkar) याने मत व्यक्त केले आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीच्या विपरीत रोहित शर्मासाठी फिटनेस हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे, असे त्याने म्हटले आहे.

हेही वाचा- मेगा ऑक्शनला लागणार चार चाँद! चक्क पश्चिम बंगालच्या मंत्र्यानं नोंदवलंय नाव, असेल सर्वांची नजर

महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेट संघात फिटनेसची संस्कृती आणली, तर विराट कोहलीने ही कल्पना परिपूर्ण केली. दुसरीकडे, रोहित शर्मासाठी फिटनेस हा चिंतेचा विषय आहे. फिटनेसमुळेच न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितला विश्रांती देण्यात आली होती आणि तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित आगरकर म्हणाला की, “एक कर्णधार म्हणुन तंदुरुस्त राहणे हे रोहितसाठी सर्वात मोठे आव्हान असेल. त्याला काही दुखापती झाल्याचं आपण नुकतंच बघितले आहे. त्याच्या आधी आलेले कर्णधार, मग तो विराट कोहली असो किंवा महेंद्रसिंग धोनी, हे दोघेही अत्यंत तंदुरुस्त होते आणि ते त्यांच्या कारकिर्दीत फार कमी वेळा सामने गमवायचे”.

आगरकर पुढे म्हणाला की, “धोनी आणि विराटने कर्णधार म्हणून त्यांच्या तंदुरुस्तीमुळे खूप कमी सामने गमावले आहेत, परंतु रोहितची परिस्थिती थोडी वेगळीच आहे. रोहित पूर्णपणे तंदुरुस्त असेल तरच तो प्रत्येक सामना खेळू शकेल आणि जास्त सामने खेळल्यानंतरच तो चांगला संघ बनवू शकेल. प्रत्येक सामना खेळल्यानंतरच त्याला समजेल की, कोणता खेळाडू कोणत्या परिस्थितीत कसा खेळ खेळतो? एक कर्णधार म्हणून त्याच्यासाठी हे खूप महत्वाचे असेल, जरी तो एक महान कर्णधार आहे”.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहित शर्माने आपल्या संघासाठी पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्याचा आयपीएलमधील विक्रम चांगला आहे आणि त्याने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला आहे. अशा स्थितीत तिनही फाॅरमॅटचा कर्णधार झाल्यानंतरही तो आपले कर्णधार कौशल्य उत्तम प्रकारे दाखवू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

मेगा ऑक्शनला लागणार चार चाँद! चक्क पश्चिम बंगालच्या मंत्र्यानं नोंदवलंय नाव, असेल सर्वांची नजर

आयपीएल लिलावासाठी क्रिकेटर्स तयार, पण कोणत्या फ्रँचायझीकडे किती जागा बाकी? किती आहे त्यांचे बजेट?

‘पप्पा’ कधी ‘कोटी’ खाली उतरले नाहीत, आता बेटा किती मिळवणार? पाहा ‘ज्युनियर तेंडुलकर’ची बेस प्राईज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---