भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने १५ जानेवारी रोजी अचानक कसोटी संघाचे नेतृत्त्वपद सोडत सर्वांना आश्चर्याचा धक्का (Virat Kohli Step Down As Test Captain) दिला. स्वत:हून टी२० संघाचे नेतृत्त्वपद सोडल्यानंतर त्याच्याकडून वनडे संघाची कमानही काढून घेण्यात आली होती. त्यानंतर भारतीय संघाने विराटच्या नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-२ ने गमावली आणि त्यानंतर त्याने कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली.
विराटने आपल्या या निर्णयाबद्दल सर्वप्रथम संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांना माहिती दिली असल्याचे समजत होते. यानंतर आता विराटने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय, BCCI) आणि संघ निवडकर्त्यांना (Team Selectors) आपल्या निर्णयाबद्दल कधी कळवले?, याबद्दलची माहितीही पुढे आली आहे.
व्हिडिओ पाहा- नेमका जॉन राईट आणि सेहवाग मध्ये वाद तरी काय होता?
विराटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघासोबत गेलेल्या निवडकर्ता अभय कुरुविला यांना आपल्या निर्णयाबद्दल कळवले होते. त्यांची इच्छा होती की, विराटने हा निर्णय घेऊ नये. परंतु त्याने त्यांची एक ऐकली नाही. त्यानंतर विराटने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांना यासंदर्भात कळवले होते.
इंग्रजी मॅगजिन द विकमधील वृत्तानुसार, विराटने गांगुलीला फोनवरून यासंदर्भात कळवले होते. तो गांगुलीला म्हणालेला की, त्याला कसोटी मालिका पराभवानंतर सकाळी उठल्यावर आनंदी आणि प्रसन्न वाटत नाहीये. त्यामुळे तो संघाचे नेतृत्त्व सोडू इच्छितो आहे. त्याने हेच सबब निवडकर्त्यांनाही सांगितले होते.
पुढे विराटने आपल्या निर्णयाबद्दल अधिकृत घोषणा करताना ट्वीटमध्येही हीच गोष्ट लिहिली होती. ‘मी जे काही काम करतो त्यासाठी १२० टक्के समर्पण देण्यावर मी विश्वास ठेवतो आणि जर मी ते करू शकत नसेल, तर मला माहित आहे की, असं करणे योग्य नाही. माझ्या मनात गोष्टी पूर्ण स्पष्ट असतात आणि मी कधीही संघाबरोबर अप्रामाणिक वागू शकत नाही,’ असे त्याने लिहिले होते.
कोहलीला सजमावणे आहे खूप अवघड
याप्रकरणी बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वतीने द वीकने लिहिले आहे की, जेव्हा विराटने टी२० संघाचे नेतृत्त्व सोडले होते, तेव्हा बोर्डाने त्याला असे करण्यापासून थांबवण्याचा खूप प्रयत्न केला होता. चेतन शर्मांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी संघाची निवड करण्यापूर्वी विराटला सांगितले होते की, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आम्हाला २ वेगवेगळे कर्णधार नको आहेत. पण विराटने जर एकदा काही करायचे ठरवले, तर त्याला समजावणे खूप अवघड होते. तो जे विचार करतो तेच करतो. अनिल कुंबळेंच्या घटनेवेळीही असेच झाले होते. आताही तसेच घडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“तुम्ही संघ आणि देशाला…” विराट-बीसीसीआय वादावर अखेर बोलले कपिल देव
हेही पाहा-






