---Advertisement---

विश्वचषकाच्या मुख्य फेरीआधी समोर आली अखेरची टी20 क्रमवारी! सूर्याला मिळाले हे स्थान; रोहित-विराट…

On: बुधवार, ऑक्टोबर 19, 2022 5:44 PM
virat kohli suryakumar yadav
---Advertisement---

टी20 विश्वचषकाची मुख्य फेरी सुरू होण्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाडूंची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने फलंदाजांच्या क्रमवारीतील आपले दुसरे स्थान कायम राखले असून, तो टी20 विश्वचषकात दुसरा सर्वोत्तम फलंदाज म्हणून सहभागी होईल. (New ICC Rankings)

 

आयसीसीच्या या नव्या क्रमवारीत पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याने न्यूझीलंडमधील तिरंगी मालिकेदरम्यान सातत्यपूर्ण कामगिरी केल्याने फलंदाजांच्या क्रमवारीतील आपले अव्वल स्थान भक्कम केले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्कराम आणि न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे हे तिघेही अव्वल पाच फलंदाज सामील आहेत.
इतर भारतीय फलंदाजांमध्ये केएल राहुल (13), विराट कोहली (15) आणि कर्णधार रोहित शर्मा (16) यांचा पहिल्या वीस फलंदाजांमध्ये समावेश आहे.

अव्वल 10 फलंदाजांमध्ये एकमेव बदल न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स याच्या रूपाने झाला आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्धच्या तिरंगी मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे 13 स्थानांनी झेप घेत तो 10‌ व्या स्थानावर पोहोचला.

बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन हा अव्वल अष्टपैलू खेळाडू म्हणून टी20 विश्वचषकात उतरेल. त्याने त्याने अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीला अव्वल स्थानावरून हटवले. शाकिबने न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांमध्ये सलग अर्धशतके झळकावली होती. भारताचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर कायम आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत मात्र भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या दहामध्ये भारताचा एकही गोलंदाज सामील नाही. भारताव्यतिरिक्त पाकिस्तानच्या देखील कोणत्याही गोलंदाजाला यादीत स्थान पटकावण्यात अपयश आले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
माजी प्रशिक्षकांनी गायले मोहम्मद शमीचे गुणगाण; म्हणाले ‘शाहीन आफ्रिदीपेक्षा…’

इंग्लंड संघासाठी मोठा झटका, प्रमुख वेगवान गोलंदाज टी-20 विश्वचषकातून बाहेर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---