शुक्रवारी (16 जून) बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर ऍशेस 2023 हंगामाची सुरुवात झाली. मालिकेतील पहिल्याच सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला प्रथम गोलंदाजी करावी लागली. पण संघ पहिल्या सत्रानंतर सुस्थितीत असल्याचे पाहायला मिळाले. असे असले तरी, ऑस्ट्रेलियासाटी ऍशेस 2023ची सुरुवात मात्र खूपच निराशाजनक होती.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील ही ऍशेस मालिका केवळ या दोन देशांमध्येच नाही, तर जगभरात पाहिली जाते. दोन्ही संघांचे खेळाडू या मालिकेसाठी वर्षभर तयारी करत असतात. मागच्या वर्षी याच ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क () याने पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवून दिली होती. मात्र, यावेळी ऑस्ट्रेलियासाठी पहिले षटक टाकण्यासाठी कर्णधार पॅट कमिन्स () आला आणि पहिल्याच चेंडूवर चार धावा खर्च केल्या. हा चौकार पाहिल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स देखील हैराण झाल्याचे दिसले. स्टोक्सचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Wicket in the first ball of Ashes 2021-22 to four in the first ball of Ashes 2023.
The Journey of England Test cricket.pic.twitter.com/MprQcmufnz
— Johns. (@CricCrazyJohns) June 16, 2023
ऍशेस 2022च्या पहिल्या पहिल्या चेंडूवर मिचेल स्टार्क याने इंग्लंडच्या रोरी बर्न्स () याची विकेट काढली होती. पहिला चेंडू खेळण्यासाठी आलेल्या बर्न्सला स्टार्कने खेळपट्टीवर सेट होण्यासाठी एकही चेंडू दिला नाही. अगदी पहिल्याच चेंडूवर स्टार्कने त्याचा त्रिफळा उडवला होता. मात्र, यावेळी स्टार्क प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्यामुळे पहिले षटक स्वतः कर्णधार पॅट कमिन्सने टाकले. इंग्लंडसाठी डावाची सुरुवात झॅक क्रावली आणि बेन डकेत यांनी केली. पहिला चेंडू खेळण्यासाटी क्रावली स्ट्राईकवर होता आणि त्याने कमिन्सला पहिल्या चेंडूवर खणखणीत कव्हर ड्राईव्ह मारला. हा शॉट ऑस्ट्रेलियाच्या एकही खेळाडूच्या हाती लागला नाही. दरम्यान, सोशल मीडियावर मागच्या वर्षीचा पहिला चेंडू आणि यावर्षीची पहिला चेंडू यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
The very first ball of 2021/22 Ashes ????????
You can’t just bowled a left handed batter by pitching outside leg while bowling over the wicket, unless you’re Mitchell Starc… #Ashes #AUSvENG pic.twitter.com/YtPmIKiaTw— محمد اسفند یار خان (@asfand895) December 9, 2021
दरम्यान, पहिल्या चेंडूवर इंग्लंडचा चार धावा मिळाल्या असल्या, तरी सामन्यावर पकड मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचीच दिसत आहे. इंग्लंडने 176 धावांवर आपल्या पाच विकेट्स गमावल्या आहेत. एकंदरीत पाहता पहिल्या दिवशी पाहुण्या संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले. (Last year a wicket on the first ball, this year a four! Stokes shock on the first day of the Ashes 2023)
महत्वाच्या बातम्या –
MPL: थरारक सामन्यात नाशिक टायटन्सचा विजय, छत्रपती संभाजी किंग्सचे प्रयत्न पडले तोकडे
ऍशेससाठी आयपीएल न खेळणारा संघातून बाहेर! ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया