गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर (Lata mangeshkar) यांनी अखेर जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी (६ फेब्रुवारी) वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. संगीत क्षेत्रात त्यांनी भरपूर नाव कमवलं. ५० हजारांहून अधिक गाणी गाणाऱ्या लता मंगेशकर यांना क्रिकेट पाहण्याची देखील प्रचंड आवड होती,हे जगजाहीर आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला लता मंगेशकर यांचा क्रिकेट सोबत जोडलेला किस्सा सांगणार आहोत. जो खूप कमी लोकांना माहीत आहे.
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये भारतीय संघाने पहिल्यांदाच विश्र्वचषकावर नाव कोरले होते. हा भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय होता. कारण यापूर्वी भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला नव्हता. तसेच अंतिम सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला पराभूत केले होते. दरम्यान या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना सुरू असताना लता मंगेशकर, उषा मंगेशकर आणि मीना मंगेशकर यांनी निर्जळी उपवास केला होता. ज्याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला होता.
लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, “मी,मीना आणि आशाने उपांत्य फेरीचा (१९८३ विश्वचषक) सामना सुरू असताना काहीच खाल्ले नव्हते. मी सतत भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत होते. तसेच जेव्हा भारतीय संघाने विजय मिळवला, त्यानंतर आम्ही अन्न आणि पाणी ग्रहण केले. १९८३ विश्वचषक स्पर्धा सुरू असताना, मी लंडनमध्ये होते. त्यावेळी इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी, मी कपिल देव आणि त्यांच्या संघाला रात्रीच्या जेवणासाठी बोलावले होते. त्यावेळी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या होत्या.”
तसेच त्या पुढे म्हणाल्या होत्या की, “विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर कपिल देव यांनी मला रात्रीच्या जेवणासाठी बोलावले होते. मी त्यावेळी संघाचे अभिनंदन केले होते.” सचिन तेंडुलकरला ते आपल्या मुलासारखे समजायचे. तसेच सचिन तेंडुलकर देखील त्यांना आई सरस्वती असे म्हणायचा. तसेच सरस्वती पूजनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
महत्वाच्या बातम्या :
गडी बाद केल्यानंतर मोहम्मद सिराजचे हटके सेलिब्रेशन सोशल मीडियावर होत आहे व्हायरल – व्हिडिओ
Ind vs WI : विराटने १००० वा वनडे जिंकल्यानंतर शेअर केला खास फोटो, चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया
चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा: दुहेरीत रोहन बोपन्ना व रामकुमार रामनाथन जोडीला विजेतेपद