पुणे। अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित स्वर्गीय अण्णा नेवरेकर(सर) स्मृती करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत चंद्रोज् संघाने अजिंक्य क्रिकेट क्लब संघाचा 202 धावांनी दणदणीत पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला.
ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत चंद्रोज् संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत अजिंक्य क्रिकेट क्लब संघाचा 202 धावांनी दणदणीत पराभव करत मोठा विजय मिळवून स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा खेळताना चंद्रोज् संघाने 20 षटकात 3 गडी गमावत 245 धावांचा डोंगर रचला. यात प्रशित नरुटेने उत्कृष्ट फलंदाजी करत 46 चेंडूत 8 चौकार व 3 षटकारांसह 72 धावा केल्या. चैतन्य कोंडभरेने चौफेर फटकेबाजी करत केवळ 17 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 54 धावा केल्या. प्रणव शिंदे व श्रिरंग पिल्ले यांनी प्रत्येकी 35 धावा करून प्रशित व चैतन्यला सुरेख साथ दिली. 245 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनिकेत कुडूक व जय पाटील यांच्या अचूक गोलंदाजीपुढे अजिंक्य क्रिकेट क्लब संघ 20 षटकात 9 गडी गमावत केवळ 43 धावांत गारद झाला. अनिकेत कुडूक व जय पाटील यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. 5 धावांत 3 गडी बाद करणारा अनिकेत कुडूक सामनावीर ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन माजी रणजीपटू कौशिक आफळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजिंक्य क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मनोज कदम, प्रशिक्षक बशीर नदाफ, गौरव नेवरेकर आणि सुरेंद्र वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
चंद्रोज- 20 षटकात 3 बाद 245 धावा(प्रशित नरुटे 72(46, 8×4, 3×6), चैतन्य कोंडभरे नाबाद 54(17, 6×4, 3×6), प्रणव शिंदे 35(20, 4×4, 1×6), श्रिरंग पिल्ले 35(39, 6×4), अनिकेत कुडूक नाबाद 11(4, 1×4, 1×6), सोहम साळवे 1-50, वेदांत कदम 1-47) वि.वि अजिंक्य क्रिकेट क्लब- 20 षटकात 9 बाद 43 धावा(ओम 10(8, 2×4), अनिकेत कुडूक 3-5, जय पाटील 3-4, पार्थ ब्राम्हणकर 1-6) सामनावीर- अनिकेत कुडूक
चंद्रोज् संघाने 202 धावांनी सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
सलग ५९ दिवस मॅरेथॉन धावण्याच्या जागतिक विक्रमाशी आशिष कासोदेकर यांची बरोबरी
क्रिकेटमध्ये पुन्हा ‘बॉल टेंपरिंग’चे प्रकरण समोर, पंचांनी कठोर ऍक्शन घेत आख्ख्या संघाला दिली शिक्षा