पुणे। अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत एम्.एस्.एफ संघाने परंदवाल संघाचा तर ओम साई क्रिकेट अकादमी संघाने 30 यार्ड्स अ संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत ओम अगरवालच्या चौफेर खेळीच्या जोरावर एम्.एस्.एफ संघाने परंदवाल संघाचा 3 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना विराज घारेच्या 23 धावांसह परंदवाल संघाने 20 षटकात 6 बाद 85 धावा केल्या. 85 धावांचे लक्ष ईशान शेठच्या 18, गौरव गायकवाड व अदित्य हिरे यांच्या प्रत्येकी 14 धावांसह एम्.एस्.एफ संघाने केवळ 18.2 षटकात 7 बाद 86 धावांसह पुर्ण करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू कामगिरी करणारा ओम अगरवाल सामनावीर ठरला.
दुस-या उपांत्य फेरीच्या एकतर्फी झालेल्या लढतीत ओम पाटीलच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर ओम साई क्रिकेट अकादमी संघाने 30 यार्ड्स अ संघाचा 70 धावांनी दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्यांदा खेळताना ओम साई क्रिकेट अकादमी संघाने 20 षटकात 4 गडी गमावत दमदार 143 धावा केल्या. यात ओम पाटीलने 53 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 56 तर भाविका अहिरेने 63 चेंडूत 6 चौकारांसह 56 धावा करून संघाचा डाव मजबूत केला. 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुकुंद बाबर व स्वराज्य कवचले यांच्या अचूक गोलंदाजीपुढे 30 यार्ड्स अ संघ 20 षटकात 4 बाद 73 धावात गारद झाला. ओम पाटील सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
परंदवाल- 20 षटकात 6 बाद 85 धावा(विराज घारे 23(31, 1×4), निकिता सिंग 12(27, 2×4), यश नाबाद 12(22), महेश्वर वाघ 1-12, ओम अगरवाल 1-17, शार्दुल पाटील 1-10) पराभूत वि एम्.एस्.एफ- 18.2 षटकात 7 बाद 86 धावा(ईशान शेठ 18(18, 1×4), गौरव गायकवाड 14(27, 1×4), अदित्य हिरे नाबाद 14(12, 2×4), सुधांशू कांबळे 4-13, आदित्य शेंडगे 2-8) सामनावीर- ओम अगरवाल
एम्.एस्.एफ संघाने 3 गडी राखून सामना जिंकला
ओम साई क्रिकेट अकादमी- 20 षटकात 4 बाद 143 धावा(ओम पाटील नाबाद 56(53, 7×4), भाविका अहिरे 56(63, 6×4), दक्ष किरोदीया 1-33) वि.वि 30 यार्ड्स अ- 20 षटकात 4 बाद 73 धावा(भव्य वडोदरिया 32(32, 1×4), दक्ष किरोदीया नाबाद 19(22, 1×4), मुकुंद बाबर 2-17, स्वराज्य कवचले 1-17) सामनावीर- ओम पाटील
ओम साई क्रिकेट अकादमी संघाने 70 धावांनी सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटमध्ये पुन्हा ‘बॉल टेंपरिंग’चे प्रकरण समोर, पंचांनी कठोर ऍक्शन घेत आख्ख्या संघाला दिली शिक्षा
“तुम्ही संघ आणि देशाला…” विराट-बीसीसीआय वादावर अखेर बोलले कपिल देव