१५ मार्च २०२० रोजी भारतीय संघ आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ख्राईस्टचर्च येथे टीम इंडियाने न्यूझींलड सोबत कसोटी सामना खेळला होता व त्यात भारतीय संघाचा निराशाजनक पराभव झाला होता.
त्यानंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेसोबत ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार होता. परंतु यातील पहिला सामना पावसामुळे तर बाकी दोन सामने कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आले.
सध्या भारतीय संघ कसोटी क्रमवारीत १६६ गुणांसह अव्वल स्थानी, वनडेत ११८ गुणांसह दुसऱ्या स्थानी तर टी२०मध्ये २६४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
कसोटीत-
कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीत भारताचे तीन फलंदाज पहिल्या १० खेळाडूंमध्ये आहेत. त्यात विराट कोहली (८८६) दुसऱ्या, चेतेश्वर पुजारा (७६६) सातव्या तर अजिंक्य रहाणे (७२६) दहाव्या स्थानावर आहे. गोलंदाजीत जसप्रित बुमराह (७७९) हा एकमेव खेळाडू पहिल्या १० खेळाडूत असून तो सातव्या स्थानी आहे.
कसोटीत अष्टपैलू खेळाडूंमध्ये रविंद्र जडेजा (३९७) दुसरा तर आर आश्विन (२८२) पाचवा आहे.
वनडेत-
वनडे क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार ८६९ गुणांसह अव्वल तर उपकर्णधार रोहित शर्मा ८५५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अन्य कोणताही खेळाडू पहिल्या १०मध्ये नाही.
गोलंदाजीत ७१९ गुणांसह जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. तो एकटाच भारतीय गोलंदाज पहिल्या १० गोलंदाजांत आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रविंद्र जडेजा हा २४६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये तो एकमेव भारतीय खेळाडू टाॅप १०मध्ये आहे.
टी२०-
टी२० क्रिकेटमध्ये फलंदाजीत भारताचे दोन फलंदाज पहिल्या १० खेळाडूंमध्ये आहेत. त्यात केएल राहुल(८२३) दुसऱ्या तर विराट कोहली (६७३) दहाव्या स्थानावर आहे. गोलंदाजी व अष्टपैलू खेळाडूंमध्ये कोणताही भारतीय खेळाडू टाॅप १०मध्ये नाही.
सर्वाधिक हिट्स मिळालेल्या बातम्या-
– धोनीच्या जागी खेळणं जातंय कठीण, धोनीफॅन्समुळे सतत येतो दबाव
– क्रिकेट जगताने वाहिली इरफान खानला श्रद्धांजली
– प्रश्न होता विराटचा, पण युवीने बोलती बंद केली बुमराहची
– भारताविरुद्ध सुप्पर डुप्पर फ्लाॅप ठरलेल्या खेळाडूवर ३ वर्षांची बंदी