---Advertisement---

बॉक्सिंग डे कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया कसोटी चॅम्पियनशीप गुणतालिकेत ‘नंबर वन’; भारत ‘या’ क्रमांकावर

On: मंगळवार, डिसेंबर 28, 2021 5:38 PM
Australia
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऍशेस मालिकेचा (Ashes series) थरार सुरू आहे. या मानाच्या समजल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने १ डाव आणि १४ धावांनी विजय मिळवला. यासह ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयाची हॅट्रिक करत ३-० ची विजयी आघाडी घेतली आहे. ज्याचा ऑस्ट्रेलिया संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघाला मोठा फायदा झाला आहे.

आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला धूळ चारत ऑस्ट्रेलिया संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे, तर इंग्लंड संघाची स्थिती आणखी खराब झाली आहे. गुणतालिकेत १०० टक्के विजयाच्या सरासरीसह ऑस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानी आहे, तर श्रीलंका संघ देखील १०० टक्के विजयाच्या सरासरीसह दुसऱ्या स्थानी आहे. (Latest points table of icc world test championship, after boxing day test)

आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१- २३ च्या गुणतालिकेत पाकिस्तान संघ तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तान संघाची विजयाची सरासरी ७५ टक्के आहे, तर चौथ्या स्थानी भारतीय संघ आहे.

भारतीय संघाची विजयाची सरासरी ५८.३३ टक्के आहे. भारतीय संघाचे एकूण गुण सर्व संघांपेक्षा जास्त आहे. परंतु विजयाची सरासरी कमी असल्यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तर इंग्लंड संघ ७.१४ च्या विजयी सरासरी सह ७ व्या स्थानी आहे. ही इंग्लंड संघाची आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वात निराशाजनक कामगिरी आहे.

संघाची क्रमवारी ही गुणांच्या टक्केवारीच्या आधारे निश्चित केली जाईल. विजयासाठी १२ गुण, सामना बरोबरीत राहिल्यास ६ गुण, अनिर्णित सामन्यासाठी ४ गुण आणि पराभवासाठी कुठलेही गुण नाहीये.

महत्वाच्या बातम्या :

विश्वचषक आणि ऍशेस जिंकवूनही क्रिकेट ऑस्ट्रेलिया हटविणार कोच लँगरला? वाचा सविस्तर

युवा अफगाण फलंदाजाने केली भारताच्या ‘दादा’ गोलंदाजांची धुलाई; एकाच षटकात बदलून टाकले आकडे

हे नक्की पाहा : टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं |

टीम इंडियाला सोडलं, पण एअरपोर्टवर एकट्या हरभजनला पकडलं | HARBHAJAN FINED IN NEW ZEALAND

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---