मुंबई। 4 ते 16 वर्षांमधील दहा हजारहून अधिक मुलांना स्थानिक पातळीवरील फुटबॉल सुधारणेसाठी आता सर्वोत्तम प्रशिक्षण मिळणार आहे. आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सकडून मुंबईमध्ये मंगळवारी आयोजित पत्रकारपरिषदेत याची घोषणा करण्यात आली. चर्चगेट ते ठाणे, जुहू ते पवई व लोअर परळ ते वाशी पर्यंत असलेल्या जवळपास 40 फुटबॉल केंद्रांमध्ये ही सुविधा मिळणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवा खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळेल व त्यामुळे उद्याचे फुटबॉलर होण्यास मदत होईल.
खेलो मोरची कल्पना असलेल्या फुटबॉल मेनिया अंतर्गत केंद्र व स्थानिक फुटबॉल क्लब यांच्यात प्रत्येक रविवारी सामना होतो. या सामन्याच्या माध्यमातून त्यांना आपले कौशल्य सुधारण्यास मदत मिळते. जवळपास 170 संघ अगामी काही महिन्यात सिक्स अ साईड व सेव्हन अ साईड अशा दोन फॉरमॅटमध्ये सहभागी होतील.
दोनशे मान्यताप्राप्त फुटबॉल प्रशिक्षक या कार्यक्रमामध्ये सहभागी असतील. या कार्यक्रमाअंतर्गत सराव व स्पर्धांसाठीचे योग्य नियोजन केले. यामध्ये अनेक मुलींचा देखील समावेश असेल. भारताचे आघाडी प्रशिक्षक, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि भारतीय बॅडमिंटन संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. पुलेला गोपीचंद यांनी मंगळवारी प्रशिक्षकांच्या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी शिस्त, कठोर प्रशिक्षण आणि खेळाडूवृत्ती यांचे महत्व पटवून दिले. आयडीबीआय फेडरल क्वेस्ट फॉर एक्सलेंस कार्यक्रमाचा गोपीचंद हा प्रोजेक्ट हेड आहे.
भारतीय मुलांमध्ये कौशल्य आहे व प्रत्येक खेळामध्ये ते चमक दाखवू शकतात. योग्य प्रशिक्षण, सराव व मार्गदर्शन त्यांना मिळाल्यास ते जागतिक स्तरावर आपली चमक दाखवू शकतात. असे गोपीचंद यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. आपल्याला चांगली खेळासाठीची प्रणाली उभारणे आवश्यक आहे आणि फुटबॉल मेनियाच्या माध्यमातून मुंबईत होणार आहे असे गोपीचंद पुढे म्हणाले.
फुटबॉल मेनिया हा आमचा नवीन उपक्रम आहे व भारतातील स्थानिक पातळीवरील फुटबॉलची वाढ करण्याचे आमचे लक्ष्य आहे. संस्था म्हणून आम्ही अनेक वर्षांपासून सदृढ आयुष्याबाबत आमच्या मॅरेथॉन्स आणि अवर क्वेस्ट फॉर एक्सलंस बॅडमिंटन कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगत आलेलो आहोत. खेलो मोर सोबत भागिदारी करण्यामागचा युवांमध्ये फिटनेस जागृती करणे हा मुख्य उद्दीष्ट आहे. असे आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्सचे मुख्य मार्केटिंग ऑफिसर कार्तिक रमन यांनी सांगितले.
मी आयडीबीआय फेडरल लाईफ इन्शुरन्स यांचे प्रायोजक म्हणून आल्याने आभार मानतो. आपल्याकडे फुटबॉलमध्ये खूप चांगले कौशल्यवान खेळाडू आहे. पण, स्थानिक पातळीवर सराव व संधी न मिळाल्याने ते पुढे येऊ शकले नाहीत. फुटबॉल मेनियाच्या माध्यमातून आम्ही हेच कौशल्य शोधण्यासाठी प्रणाली विकसित करणार आहोत. त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन उद्याचे चॅम्पियन खेळाडू म्हणून विकसित करण्यासाठी मदत करणार आहोत असे खेलो मोरचे संस्थापक व सीईओ जतीन परांजपे यांनी सांगितले.