---Advertisement---

महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत लॉराचा जलवा! बनली आख्खा एक हंगाम गाजवणारी पहिलीच खेळाडू

Laura-Wolvaardt
---Advertisement---

महिला टी-२० चॅलेंजचा अंतिम सामना शनिवारी (२८ मे) खेळला गेला. सुपरनोव्हाज आणि वेलोसिटी हे संघ अंतिम सामन्यात आमने सामने होते. या महत्वाच्या सामन्यात सामन्यात सुपरनोव्हाजने विजय मिळवला आणि इतिहासात तिसऱ्यांदा महिला टी-२० चॅलेंजचे विजेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्डने या सामन्यात मोठी खेळी केली आणि एका खास विक्रमाची नोंद देखील केली.

महिला टी-२० चॅलेंजचा (Women’s T20 Challenge) चालू हंगाम २३ मे रोजी सुरू झाला झाला. या हंगामात एकूण तीन संघ सहभागी झाले होते आणि अंतिम सामन्यासह एकूण चार सामने खेळले गेले. पुण्याच्या एमसीएस स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सुपरनोव्हाजने ४ धावांनी विजय मिळवला. या सामन्याचा थरार शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला.

लॉरा वोल्वार्ड या हंगामात (Laura Wolvaardt) वेलोसिटी संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसली. चालू हंगामात तिने दोन अर्शशतक केली आणि टी-२० चॅलेंजच्या इतिहासातील पहिली अशी खेळाडू बनली, जिने एका हंगामात एकापेक्षा अधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. हंगामातील पहिला सामना सुपरनोव्हाज आणि वेलोसिटी यांच्यात खेळला गेला होता, ज्यामध्ये वोलवॉर्डने ३५ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या होत्या. त्यानंतर आता स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेलोसिटीच्या वोल्वार्डने पुन्हा एकदा याच संघाविरुद्ध ४० चेंडूत नाबाद ६५ धावा केल्या. वोलवॉर्डव्यतिरिक्त एकही खेळाडू अशी नाहीये, जिने टी-२० चॅलेंजच्या एका हंगामात दोन अर्धशतके केली असतील.

दरम्यान, उभय संघातील या अंतिम सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर वेलोसिटीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाजने ७ विकेट्सच्या नुकसानावर १६५ धावा केल्या. १६६ धावांचे लक्ष्य वेलोसिटीला गाठता आले नाही. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला गेला. वेस्ट इंडीजची डिएंड्रा डॉटीन या सामन्यात सामीवीर पुरस्काराची मानकरी ठरली. डॉटीनने फलंदाजी करताना ४४ चेंडूत ६२ धावा केल्या, तर गोलंदाजीत ४ षटकांमध्ये २८ धावा खर्च करून २ विकेट्स घेतल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

वय सोडा, कामगिरी पाहा! आयपीएलमध्ये ‘असा’ कारनामा फक्त धोनी अन् कार्तिकलाच जमलाय, टाका एक नजर

महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत हरमनप्रीतच्या संघाचाच दबदबा, वेलोसिटीला हरवत तिसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी

सुपर से भी ऊपर! ख्रिस लिनचा गगनचुंबी षटकार, स्टेडियमबाहेरील घरात जाऊन पडला चेंडू- Video

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---