ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथ याला त्याच्या मोठ्या आकडी धावा करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. आजवर स्मिथपुढे भल्याभल्या गोलंदाजांनी आपले गुडघे टेकले आहेत. परंतु भारत-ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यात स्मिथला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. पण गुरुवारपासून (७ जानेवारी) सिडनीमध्ये चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्मिथने जबरदस्त फलंदाजी करत दमदार पुनरागमन केले आहे.
कसोटीत सर्वाधिक धावा करणारा तिसरा सक्रिय खेळाडू
या ३१ वर्षीय फलंदाजाने ऑस्ट्रेलिया संघाचा डाव कोलमडत असताना मैदानावर एंट्री मारली आणि शेवटपर्यंत टिकून संघासाठी अधिकाधिक धावा जोडण्याचा प्रयत्न केला. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ५७.९६च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत १३१ धावा केल्या. दरम्यान त्याने १६ चेंडूंना सीमारेषेपार पाठवले. त्याच्या झुंजार शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात ३३८ धावांचा आकडा गाठला.
कसोटी कारकिर्दीत शतक करण्याची ही स्मिथची २७वी वेळ होती. या शतकासह स्मिथने कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या सक्रिय फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. ७६ कसोटी सामन्यातील १३६ डावात फलंदाजी करताना त्याने ७३६८ धावा केल्या आहेत.
कसोटीत सर्वाधिक धावा करणारे सक्रिय खेळाडू
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सक्रिय फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा कर्णधार जो रुट अव्वलस्थानी विराजमान आहे. त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ९७ सामन्यात ७८२३ धावा केल्या आहेत. तर रॉस टेलर ७३७९ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या खात्यात ७३१८ धावांची नोंद आहे. तर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (७२४९ धावा) आणि केन विलियम्सन (७११५ धावा) अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.
विशेष म्हणजे, यापुर्वी कोहली या यादीतील तिसऱ्या स्थानावर होता. मात्र शतकासह स्मिथने ११ पेक्षा कमी डावांच्या आतच कोहलीच्या तिसऱ्या स्थानावर ताबा मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS : दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या २ बाद ९६ धावा; गिलचे शानदार अर्धशतक
जड्डूच्या बुलेट थ्रोने स्मिथच्या शतकी खेळीचा अंत, व्हिडिओ पाहून कराल कौतुक
चालू सामन्यात लॅब्यूशानेचा शुबमन आणि रोहितला डिवचण्याचा प्रयत्न, एकदा व्हिडिओ पाहाच