भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध 14 नोव्हेंबरपासून 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत खेळवला जाणारा या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. कोलकातामधील इडन गार्डनवर होणारा हा सामना भारताचा हा कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना आहे.
त्यामुळे या ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये भारतीय दिग्गज टेनिसपटू लिएँडर पेस, राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना निमंत्रण पाठवले आहे.
त्यांच्याव्यतिरिक्त या सामन्यासाठी भारताचा बुद्धिबळपटू विश्वनाथ आंनद आणि भारतीय महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
यांच्याबरोबर ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, जागतिक बॅडमिंटन चॅम्पियन पीव्ही सिंधू आणि स्टार बॉक्सर मेरी कोम यांचा बंगाल किक्रेट असोसिएशनकडून सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच या सामन्यासाठी बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ बघतील.
याशिवाय बीसीसीआयने सचिन तेंडुलकर आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देखील आमंत्रण पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही या सामन्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.






