---Advertisement---

लिएंडर पेस राजकारणाच्या कोर्टमध्ये! ‘या’ पक्षासाठी गोव्यातून लढवणार निवडणूक

On: रविवार, डिसेंबर 19, 2021 12:43 AM
leander-paes
---Advertisement---

भारताचे दिग्गज टेनिस खेळाडू लिएंडर पेस (leander paes) यांची कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. त्यांनी टेनिसमधील  जवळपास सर्व ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि आता ते नवीन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. पहिल्या डावात त्यांनी टेनिसमध्ये चांगले प्रदर्शन केले आणि आता राजकारणाच्या रूपातून दुसऱ्या डावाची सुरुवात केली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी गोवा तृणमूल कॉग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला होता, आता त्यांनी या प्रवेशाबाबत एका मुलाखतीत सविस्तर चर्चा केली आहे. मुलाखतीत त्यांनी त्यांच्या राजकारणातील पुढच्या नियोजनाविषयी आणि इतरही काही मुद्यांवर चर्चा केली.

मुलाखतीत त्यांना कारकिर्दीतीत या दुसऱ्या डावाकडे कसे पाहता? हे खेळापेक्षा किती वेगळे आहे? असा प्रश्न विचारला गेला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “दुसरा डाव माझ्यासाठी एकप्रकारे वरदान आहे, याची सुरुवात चांगली झाली आहे. रस्त्यावर प्रचार करणे, लोकांच्या घरात जाणे आणि त्यांच्यासोबत बसून चर्चा करताना मला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेणे एक वेगळा अनुभव आहे. राजकारणात येण्याचे माझे उद्दिष्ट लोकांच्या जीवनात बदल आणणे  आणि त्यांच्यासाठी काहीतरी चांगले करणे आहे. हिच माझी प्रेरणा आहे आणि हिच माझी आवड आहे.”

पेस यांना तृणमूल कॉग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या रूपात पाहिले जात आहे. मुलाखतीत त्यांना याबाबतीत देखील प्रश्न विचारला गेला. मुलाखतीत त्यांना विचारले गेले की, तुम्ही या सगळ्याकडे कसे पाहता? त्यावर उत्तर देताना पेस म्हणाले, “माझी नजर मुख्यमंत्रीपदावर नाहीय. मी आताच माझ्या नवीन डावाची सुरुवात केली आहे. मला रोज नवीन शिकायचे आहे. चांगले प्रशासन माझी आवड आहे. माझे लक्ष लोकांचे आयुष्य चांगले बनवने आहे. मी मिळालेल्या संधींसोबत पुढे जाईल आणि माझी मेहनत, मुल्य, देशभक्ती आणि आवड यांच्यासह काम करील. त्याव्यतिरिक्त लोकांसोबत त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची आमची क्षमता चांगली आहे आणि आम्ही गरजेचे बदल करू शकलो, तर ही सर्वात चांगली गोष्ट असेल.”

महत्वाच्या बातम्या –

न्यूझीलंडच्या ३४ वर्षीय गोलंदाजाने केली तरूणांना लाजवेल अशी कामगिरी; ३.५ षटकात मिळवले ‘इतके’ बळी

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटला स्थान नाहीच! आता आयसीसी म्हणतेय…

राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी स्पर्धा: पंजाब, कर्नाटक व यूपीची उपांत्य फेरीत धडक; महाराष्ट्रासमोर तमिळनाडूचे आव्हान

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---