---Advertisement---

विराट कोहली हा मोठा पराक्रम करत रोहित शर्माला ठरला सरस!

On: सोमवार, ऑगस्ट 12, 2019 3:16 PM
---Advertisement---

पोर्ट ऑफ स्पेन। रविवारी(11 ऑगस्ट) भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात डकवर्थ लूईस नियमानुसार 59 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी करण्याबरोबरच रोहितचा एक विश्वविक्रम मोडला आहे.

विराटने या सामन्यात 125 चेंडूत 120 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटच्या आता वेस्ट इंडीजविरुद्ध वनडेमध्ये 35 सामन्यात 34 डावात 2032 धावा झाल्या आहेत.

त्यामुळे विराट वेस्ट इंडीज विरुद्ध 2000 वनडे धावा करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच विंडीजविरुद्ध सर्वात वेगवान 2000 धावा करण्याचा विक्रमही विराटने केला आहे. त्याचबरोबर एखाद्या संघाविरुद्ध वनडेत सर्वात वेगवान 2000 धावा करण्याचा विश्वविक्रमही आता विराटच्या नावावर झाला आहे.

याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने 37 सामन्यांत ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध जलद 2000 धावा केल्या आहेत. तसेच या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर तिसऱ्या स्थानावर असून सचिनने 40 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच जलद 2000 हजार वनडे धावा केल्या आहेत.

एखाद्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध जलद 2 हजार वनडे धावा करणारे खेळाडू- 

34 डाव – विराट कोहली, वेस्ट इंडीज

37 डाव – रोहित शर्मा, ऑस्ट्रेलिया

40 डाव – सचिन तेंडूलकर, ऑस्ट्रेलिया

44 डाव – व्हिव्हियन रिचर्ड, ऑस्ट्रेलिया

44 डाव – विराट कोहली, श्रीलंका

45 डाव – एमएस धोनी, श्रीलंका

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

किंग कोहलीने गांगुलीच्या या ‘दादा’ विक्रमाला टाकले मागे

गांगुली-तेंडुलकरनंतर विराट-रोहितची जोडीच ठरली बेस्ट!

विराट कोहलीने रचला इतिहास; असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment