---Advertisement---

२७वे कसोटी शतक करणाऱ्या किंग कोहलीची सचिन तेंडूलकरच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी

On: शनिवार, नोव्हेंबर 23, 2019 3:01 PM
---Advertisement---

कोलकाता। कालपासून (22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात इडन गार्डन्स स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामन्याला(Day-Night Test) सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) शतकी खेळी केली आहे.

विराटने 159 चेंडूत 12 चौकारांसह आज शतक पूर्ण केले आहे. तसेच त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील 27 वे शतक(27th Test Century) आहे. तसेच त्याने 141 व्या कसोटी डावात खेळताना 27 वे कसोटी शतक पूर्ण केले आहे.

त्यामुळे विराटने सर्वात जलद 27 वे कसोटी शतक करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची बरोबरी केली आहे. सचिननेही 141 डावात 27 वे कसोटी शतक केले होते.

त्यामुळे आता या यादीत विराट आणि सचिन संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे महान माजी क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन आहेत. त्यांनी 70 कसोटी डावात 27 शतके केली होती.

सर्वात जलद 27 कसोटी शतके करणारे क्रिकेटपटू –

70 डाव – डॉन ब्रॅडमन

141 डाव – विराट कोहली

141 डाव – सचिन तेंडूलकर

154 डाव – सुनील गावस्कर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---