fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

तब्बल ३५ वर्षांनी आली टीम इंडियावर एवढी मोठी नामुष्की

मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 54 धावा केल्या आहेत. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर संपुष्टात आला आहे. भारत 346 धावांनी आघाडीवर आहे.

मात्र भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अडखळत झाली आहे. भारताने हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्या विकेट्स लवकर गमावल्या आहेत.

यामुळे भारतीय संघाबाबत एक नकोसा विक्रम झाला आहे. भारताच्या या सामन्यातील मधल्या फळीने(3-6 क्रमांकावर फलंदाजी करणारे फलंदाज) एका डावात सर्वात कमी धावा करण्याच्या 72 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

या सामन्यात कोहली आणि पुजाराला तर या डावात भोपळाही भोडता आला नाही. तर रहाणेने 1 आणि रोहितने 5 धावा केल्या. त्यामुळे भारताच्या मधल्या फळीने फक्त 6 धावांचे योगदान या डावात दिले आहे.

याआधी असे 1946 मध्ये इंग्लंड विरुद्ध मँचेस्टरमध्ये खेळताना पहिल्या डावात झाले होते. त्यावेळी अब्दुल करदार(1), विनू मंकड(0), विजय हजारे(3) आणि रुसी मोदी(2) यांनी मधल्या फळीत फलंदाजीला येऊन फक्त मिळून 6 धावा केल्या होत्या.

तसेच दुसऱ्या डावातील भारताची ही मधल्या फळीने केलेल्या या सर्वात कमी धावा ठरल्या आहेत आहेत. याआधी 1983 मध्ये विंडीज विरुद्ध अहमदाबाद कसोटीत भारताच्या मधल्या फळीने दुसऱ्या डावात 9 धावांचेच योगदान दिले होते. त्यानंतर आज 35 वर्षांनी भारतीय संघावर ही नामुष्की ओढावली आहे. 

भारताच्या मधल्या फळीने(3-6 क्रमांकावर फलंदाजी करणारे फलंदाज) एका डावात केलेल्या सर्वात कमी धावा-

6 धावा – विरुद्ध इंग्लड, मँचेस्टर, 1946 (पहिला डाव)

6 धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, 2018 (दुसरा डाव)

9 धावा – विरुद्ध न्यूझीलंड, हैद्राबाद, 1969 (पहिला डाव)

9 धावा – विरुद्ध विंडीज, अहमदाबाद, 1983 (दुसरा डाव)

महत्त्वाच्या बातम्या:

१२ वर्षांपूर्वी कुंबळेने केलेला विक्रम बुमराह, शमीकडून मोडीत

जसप्रीत बुमराह कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई गोलंदाज

विराट कोहलीच्या टीम इंडियाचे ते स्वप्न अखेर झाले पुर्ण

You might also like