भारताचा एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) स्पष्ट केलं आहे की आता टी20 विश्वचषक विजयाच्या आनंदातून पुढे जाण्याची वेळ आली आहे. रोहित श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे तसंच त्याची नजर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर असेल. रोहितनं नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन आव्हान स्वीकारण्याची आशा व्यक्त केली आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय सामना शुक्रवारी (2 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “क्रिकेटपासून दूर मी चांगला वेळ घालवला. टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर मायदेशी परतणे खूप छान वाटत होते, दिल्ली आणि मुंबईतील अनुभव अप्रतिम होता, पण आता क्रिकेट जसजसे पुढे जाईल तसतसे आम्हाला पुढे जायचे आहे.”
टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहितनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्यासोबत विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनीही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटला अलविदा केले. यावर रोहित म्हणाला, “आम्ही यापूर्वी जे काही प्रदर्शन केले आहे ते त्या विशिष्ट वेळेसाठी चांगले होते, परंतू वेळ पुढे सरकत राहतो आणि आपण पुढेही जात राहिले पाहिजे.”
टी20 विश्वचषकानंतर प्रथमच भारतीय कर्णधार रोेहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसणार आहेत. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे मालिकेपूर्वी नव्या प्रशिक्षकाबद्दल रोहितचे लक्षवेधी वक्तव्य, म्हणाला “गौतम भाई ड्रेसिंग रूममध्ये….”
भारतीय संघात संधी कोणाला पंत की राहुल? कर्णधार रोहित शर्मानं सांगितला निर्णय
मुख्यमंत्र्यांकडून स्वप्नील कुसाळेच्या पाठीवर कौतुकाची थाप, एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी बक्षीस रक्कम