जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित टी20 लीगमध्ये इंडियन प्रीमिअर लीगचा समावेश होतो. या स्पर्धेचा सध्या 16वा हंगाम सुरू आहे. या स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात झाली आहे. तब्बल 3 वर्षांनंतर आयपीएल पुन्हा एकदा जुन्या अंदाजात परतली आहे. आयपीएल यावर्षी ‘होम आणि अवे’ या प्रकारात खेळली जाणार आहे. यासोबतच आयपीएल 2023 सुरू होण्यापूर्वी ओपनिंग सेरेमनीदेखील धुमधडाक्यात झाली. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदाना यांनी डान्सचा तडका लावला. यावेळी रश्मिकाचा डान्स पाहून माजी भारतीय दिग्गज सुनील गावसकर हेदेखील स्वत:ला डान्स करण्यापासून रोखू शकले नाहीत. सुनील गावसकर रश्मिका मंदाना हिच्यासोबत ठुमके लावताना दिसले.
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) दोघेही आरआरआर सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. तसेच, त्यांच्या मागे स्क्रीनवर रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) या गाण्यावर डान्स करत आहे. खरं तर, रश्मिका जशी नाटू नाटू गाण्यावर डान्स करू लागते, तसे गावसकरही स्वत:ला रोखू शकत नाहीत. ते डान्स करण्यासाठी पुढे येतात आणि सोबत इरफान पठाणलाही नाचायला सांगतात.
सुनील गावसकर आणि इरफान पठाण (Sunil Gavaskar And Irfan Pathan) ‘नाटू नाटू’ गाण्याच्या सिग्नेचर डान्स स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्न करत होते. इरफानचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडत आहे. तसेच, कमेंट्सचा पाऊसही पाडत आहेत. इरफानने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “कुणी चांगला डान्स केला? आम्ही (सुनील गावसकर आणि मी) की, रश्मिका मंदाना.”
https://www.instagram.com/p/CqlGhwxATMK/
खरं तर, यापूर्वीही गावसकरांनी डान्सचा एक व्हिडिओ ओपनिंग सेरेमनीच्या दिवशी व्हायरल होता. आयपीएल 2023 स्पर्धेच्या ऑस्ट्रेलिया प्रेझेंटरने सुनील गावसकरांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत गावसकर ‘पुष्पा’ सिनेमातील ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स करताना दिसले होते. या व्हिडिओत रश्मिकाही स्क्रीनवर डान्स करत होती. तसेच, गावसकर तिला पाहून डान्स स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्न करत होते.
आयपीएल 2023
आतापर्यंत आयपीएल 2023 स्पर्धेतील 6 सामने पार पडले आहेत. गुणतालिकेत 1 सामना जिंकून आणि 2 गुणांसह राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. तसेच, लखनऊ सुपर जायंट्स संघाला 2 सामन्यात 1 विजय आणि 1 पराभव मिळाला आहे. ते 2 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत. गुजरात टायटन्स संघ 1 विजयासह चौथ्या स्थानी आहे. तसेच, पंजाब किंग्स 1 विजयासह पाचव्या, तर चेन्नई सुपर किंग्स संघ 2 पैकी एक विजयासह सहाव्या स्थानावर आहे. (legend cricketer sunil gavaskar dance on naatu naatu and rashmika mandanna at ipl 2023 opening ceremony video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात धोनी प्रेम! ‘माही’ला टीव्हीवर पाहताच चाहत्याने ओवाळली आरती, व्हिडिओ तुफान व्हायरल
‘तुम्ही सगळी जबाबदारी तिलकवर टाकू शकत नाहीत…’, भारतीय दिग्गजाने मुंबई इंडियन्सला सुनावले खडेबोल