---Advertisement---

टीम इंडियाची बॅटिंग पाहून गावसकरांना झाली अजिंक्य रहाणेची आठवण; म्हणाले, ‘जर तो असता, तर आज…’

On: बुधवार, डिसेंबर 27, 2023 9:39 AM
Ajinkya-Rahane-And-Sunil-Gavaskar
---Advertisement---

Sunil Gavaskar On Ajinkya Rahane: भारतीय संघ मंगळवारपासून (दि. 26 डिसेंबर) खेळल्या जात असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या पहिल्या डावात बॅकफूटवर पडला. यजमान दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने विकेट्सचे पंचक पूर्ण करत भारतीय फलंदाजांना घाम फोडला. वनडे विश्वचषकानंतर रबाडा दीर्घ काळ क्रिकेटपासून दूर होता. दुखापतीमुळे तो सरावही करू शकला नाही. तो जवळपास या मालिकेतून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर होता.

परंतु अखेरच्या वेळी कागिसो रबाडा (Kagiso Rabada) कसोटी मालिकेचा भाग बनला आणि पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजी क्रम उद्ध्वस्त केला. अशात भारताच्या फलंदाजी प्रदर्शनावर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी यावेळी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचे नाव घेत मोठे विधान केले.

काय म्हणाले गावसकर?
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांना संघर्ष करावा लागला. भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 8 विकेट्स गमावत 208 धावा केल्या. रोहित शर्मा (5), शुबमन गिल (2) हे कमाल करू शकले नाहीत. केएल राहुल एकटा दमदार फलंदाजी करत 70 धावांवर नाबाद आहे. भारताची अशी फलंदाजी पाहून गावसकर म्हणाले की, जर संघात रहाणेला निवडले असते, तर सेंच्युरियनमध्ये भारताची धावसंख्या वेगळी असती.

भारतीय दिग्गजांनी 2018-19दरम्यानच्या कसोटी मालिकेदरम्यानच्या आठवणी ताज्या केल्या. त्यांनी सांगितले की, कशाप्रकारे रहाणेला सुरुवातीच्या दोन सामन्यात संधी दिली गेली नव्हती. तसेच, अखेरच्या सामन्यात येऊन त्याने भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

गावसकर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले की, “पाच वर्षांपूर्वी जोहान्सबर्गच्या खेळपट्टीविषयी लोक चर्चा करत आहेत आणि मी तिथे होतो. होय, तेथील खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते आणि अजिंक्य रहाणे, ज्याला सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी निवडले गेले नव्हते, त्याला तिसऱ्या सामन्यात संधी मिळाली. त्याने दाखवून दिले की, टीम इंडियाने काय गमावले आहे. कारण, यापूर्वी भारत सुरुवातीचे काही कसोटी सामने इतक्या मोठ्या अंतराने हरला नव्हता. कारण, रहाणे परदेशात चांगले क्रिकेट खेळतो. कदाचित जर तो आज असता, तर कहाणी पूर्णपणे वेगळी असती.”

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1739848624446783585

रहाणेला केलेलं ड्रॉप
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना 2022च्या सुरुवातीच्या कसोटी क्रिकेटमधील खराब प्रदर्शनामुळे ड्रॉप केले गेले होते. संघाला त्यांच्या जागी नवीन खेळाडूंना संधी द्यायची होती. मात्र, पुजाराने काऊंटी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शनाच्या जोरावर पुनरागमन केले होते, पण रहाणेला जवळपास 12 महिने बाहेर बसावे लागले होते. मात्र, आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन केल्यानंतर त्याला पुनरागमन करण्यात यश आले होते. त्यानंतर तो भारतासाठी महत्त्वाचे कसोटी सामनेही खेळला. (legend cricketer sunil gavaskar says india missed ajinkya rahane as south africa pacers dominate in 1st test ind vs sa)

हेही वाचा-
IND vs AUS । बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेच्या नावावर, केएल राहुलमुळे भारत सुस्थितीत
VIDEO । थोडक्यात वाचला शार्दुल! मुंबईने पाच कोटी दिलेल्या गोलंदाजाने फोडलं असतं डोकं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---