जागतिक क्रिकेट असो किंवा आयपीएलसारखी टी20 लीग, या सर्व स्तरावर भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू एमएस धोनी याने आपली छाप सोडली आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जवळपास 3 वर्षांपूर्वीच निवृत्त झाला आहे, पण तो अजूनही आयपीएलमध्ये सक्रिय आहे. धोनीच्या कर्तृत्वामुळे अनेक युवा खेळाडू त्याला आदर्श मानतात. शुक्रवारी (दि. 21 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघातील सामना धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईने 7 विकेट्सने जिंकला. यानंतर एमएस धोनीने हैदराबादच्या खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्याने खेळाडूंना काही धडेही दिले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) स्पर्धेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत एमएस धोनी (MS Dhoni) हैदराबादच्या युवा खेळाडूंशी बोलताना दिसत आहे. या खेळाडूंमध्ये उमरान मलिक, अब्दुल समद यांचाही समावेश आहे. सर्व खेळाडू हात बांधून धोनीचे बोल ऐकत आहेत. त्यामुळे धोनीचा हा गुरुमंत्र युवा खेळाडूंना त्यांच्या खेळात नक्कीच उपयोगी पडेल.
When @msdhoni speaks, the youngsters are all ears 😃
Raise your hand 🙌🏻 if you also want to be a part of this insightful session 😉#CSKvSRH | @ChennaiIPL pic.twitter.com/ol83RdfbBg
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2023
खेळाडू तर सोडाच यावेळी हैदराबादच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील असलेला माजी भारतीय फलंदाज हेमंग बदानी हादेखील धोनीचे बोल ऐकताना दिसला. अर्थातच, त्यालाही धोनीच्या या धड्याचा नक्कीच फायदा होईल. शेवटी धोनी हा जगातील सर्वोत्तम कर्णधारांच्या यादीत गणला जातो. धोनीला खेळाची जितकी जाण आहे, तितकी जाण खूपच कमी लोकांच्या वाट्याला येते.
चेन्नईचा हैदराबादवर दणदणीत विजय
चेन्नई संघाने फिरकीपटूंच्या जोरावर हैदराबादवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. चेन्नईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडिअम हे संथ आणि फिरकीपटूंसाठी फायदेशीर खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर धोनीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्याच्या फिरकीपटूंनी कमाल केली. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने 4 षटके गोलंदाजी करताना 22 धावा खर्च करत 3 विकेट्सची कमाई केली. त्यामुळे हैदराबाद संघ 7 विकेट्स गमावत 134 धावाच करू शकला.
या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांच्या 87 धावांच्या भागीदारीमुळे हैदराबादला चिंतेत टाकले. त्यांची ही भागीदारी पहिल्या विकेटसाठी झाली. कॉनवेने 57 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या, तर ऋतुराज 35 धावांवर बाद झाला. अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायुडू यांनी प्रत्येकी 9 धावा केल्या. शेवटी चेन्नईने 138 धावा चोपत आणि 8 चेंडू शिल्लक ठेवत सामना खिशात घातला.
3⃣ crucial wickets and just 22 runs with the ball 🙌🏻@imjadeja receives the Player of the Match award in @ChennaiIPL's 7-wicket win over #SRH 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/0NT6FhLKg8#TATAIPL | #CSKvSRH pic.twitter.com/QtdnmgTQ5q
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2023
गुणतालिकेविषयी बोलायचं झालं, तर चेन्नई संघ 6 सामन्यात 4 विजयांसह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्स दुसऱ्या, तर राजस्थान रॉयल्स संघ पहिल्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही संघांचे गुण हे 8 इतके आहेत. मात्र, नेट रनरेटच्या आधारे राजस्थान संघ अव्वलस्थानी आहे. (legend ms dhoni talking to sunrisers hyderabad players after csk beat srh video viral see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा आणि…’ हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर धोनीचे खळबळजनक भाष्य
जडेजा पुढे सनरायझर्सचे लोटांगण! आयपीएल 2023 मध्ये जड्डूचा जलवा कायम