भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. भारताला डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर भारतीय दिग्गज खेळाडू सुनील गावसकर भलतेच संतापले. त्यांनी फलंदाजांवर आगपाखड केली. गावसकरांनी विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा याच्या शॉट निवडीवर प्रश्नचिन्ह उभे केले. अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांचे फलंदाजी प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले. त्यामुळे भारतावर तब्बल 209 धावांनी पराभवाची नामुष्की ओढवली.
काय म्हणाले गावसकर?
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले की, “आमची फलंदाजी आज लज्जास्पद होती. जे काही आपण आज पाहिले, ते खूपच खराब प्रदर्शन होते. खासकरून शॉटची निवड. आपण काल पुजाराकडून काही सामान्य शॉट पाहिले होते. पुजाराकडून असे शॉट खेळण्याची अपेक्षा तुम्ही करूच शकत नाहीत. कदाचित त्याच्या डोक्यात काहीतरी घुसले होते आणि त्याला स्ट्राईक रेट, स्ट्राईक रेट बोलत होते. तुम्ही एका सत्रापर्यंतही टिकू शकला नाहीत. 8 विकेट्स एक सत्रही टिकू शकले नाहीत? चला.”
विराटलाही फटकारले
गावसकरांनी विराटच्याही शॉट निवडीवर चर्चा केली. ते म्हणाले की, “तो एक खूपच सामान्य शॉट होता. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू तो यापूर्वी सोडत होता. कदाचित तो त्याचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी आतुर होता. जेव्हा तुम्ही कोणत्याही विक्रमाच्या जवळ असता, तेव्हा असे होते.”
पुढे बोलताना गावसकर असे म्हणाले की, “तो खूपच खराब शॉट होता. तुम्ही विराटला विचारले पाहिजे की, त्याने हा काय शॉट खेळला. तो एक सामना जिंकण्यासाठी मोठी खेळी खेळण्याविषयी खूप बोलत असतो. जर तुम्ही अशाप्रकारे ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूशी छेडछाड कराल, तर तुम्ही हे काम कसे करून दाखवाल?”
भारतीय संघ चौथा अंतिम सामना पराभूत
भारतीय संघाने मागील 10 वर्षात हा चौथा अंतिम सामना गमावला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी झोडपले. सन 2014मध्ये टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही भारताला पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही पाकिस्तानने भारताला चॅम्पियन बनण्यापासून रोखले होते. तसेच, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या हंगामातही भारताने अंतिम सामना गाठला होता, पण त्यावेळीही न्यूझीलंड संघ भारतावर भारी पडला होता. (legend sunil gavaskar looked disappointed with team india batsman performance and also raises question)
महत्वाच्या बातम्या-
‘ऑलिम्पिकमध्येही गोल्ड जिंकण्यासाठी फक्त एकच शर्यत असते’, रोहितच्या ‘त्या’ विधानावर कमिन्सचे मोठे भाष्य
सचिनने केले टीम इंडियाच्या पराभवाचे विश्लेषण; म्हणाला, ‘त्याला बाहेर केल्याने…’