---Advertisement---

VIDEO:..आणि गावसकरांनी शर्टवर घेतला धोनीचा ऑटोग्राफ, पाहा आयपीएलमधील सर्वात भावनिक क्षण

---Advertisement---

आयपीएल 2023 स्पर्धेचा 61वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघाला सहा गड्यांनी पराभूत व्हावे लागले. या सामन्यानंतर चेन्नईच्या सर्व संघाने आपल्या चाहत्यांना अभिवादन करताना मैदानाला फेरी मारली. त्यावेळी समालोचन करत असलेले भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांना एमएस धोनी याचा ऑटोग्राफ घेण्याचा मोह आवरला नाही. 

चेन्नईला या सामन्यात विजयाची आशा होती. मात्र, केकेआरच्या संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करताना चेन्नईला पराभवाचा धक्का दिला. असे असले तरी चेन्नईच्या संघाने आपल्या अखेरच्या घरच्या सामन्यानंतर प्रेक्षकांना अभिवादन सर्वच खेळाडूंनी प्रेक्षकांना भेटवस्तू दिल्या.‌ चेन्नईचे खेळाडू मैदानाला फेरी मारत असताना समालोचन करत असलेल्या, सुनील गावसकर यांनी केलेल्या एका कृतीमुळे सर्वजण चकीत झाले. गावसकर हे धावत धोनीकडे आले आणि त्याच्याशी बोलू लागले. त्यावेळी त्यांनी धोनी याला त्यांच्या शर्टवर ऑटोग्राफ देण्याची विनंती केली. धोनीने ही विनंती मान्य करत त्यांना ऑटोग्राफ दिला. त्यानंतर धोनीने त्यांना कडकडून मिठी मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धोनी आपला अखेरचा हंगाम खेळत असल्याचे सांगितले जात आहे. 41 वर्षांचा धोनी वाढत्या वयामुळे पुढील वर्षी खेळण्याची शक्यता अत्यंत कमी दिसते. त्यामुळे तो सहभागी झालेल्या सर्वच सामन्यांना मोठी गर्दी पाहायला मिळली. चेन्नई आपला अखेरचा सामना दिल्ली येथे खेळेल. त्यानंतर प्ले ऑफसाठी पात्र ठरल्यास त्यांना पुन्हा एकदा चेन्नईत खेळण्याची संधी मिळणार आहे.

(Legend Sunil Gavaskar Took Autograph Of MS Dhoni On His Shirt)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
विराटकडून युवा जयसवालला गुरुमंत्र! सामन्यानंतर खास टिप्स देताना दिसला ‘किंग’, पाहा व्हिडिओ
हा तर RCBचा धोनी! भावाने स्टंप्सकडे न पाहताच अश्विनला केले यष्टीचीत, ‘नो लूक’ Runout व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---