इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या महारणसंग्रामाला दिमाखात सुरुवात झाली. शुक्रवारी (दि. 31 मार्च) पार पडलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. मात्र, चेन्नई सुपर किंग्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात एमएस धोनी याच्याकडे असे दोन अष्टपैलू खेळाडू होते, ज्यांना तो गोलंदाजीसाठी वापरू शकत होता. मात्र, त्याने मोईन अली आणि शिवम दुबे यांच्याकडून गोलंदाजी करवून घेतली नाही. अशात चेन्नईच्या पराभवानंतर माजी दिग्गज वीरेंद्र सेहवाग एमएस धोनी याच्या निर्णयावर हैराण झाला.
काय म्हणाला सेहवाग?
एका वेबसाईटशी बोलताना वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) तुषार देशपांडे (Tushar Deshpande) याचा वापर केल्यामुळे निराश दिसला. तुषारला अंबाती रायुडू याच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर (Impact Player) म्हणून संघात घेतले होते. सेहवागच्या मते, वेगवान गोलंदाज जास्त धावा खर्च करत होते, अशात एमएस धोनी (MS Dhoni) याला सामन्यादरम्यान मोईल अली याला षटक द्यायला पाहिजे होते.
सेहवाग म्हणाला की, “जर धोनीने मध्ये कुठेतरी मोईन अली याला एक षटक टाकण्यासाठी आणले असते, तर त्याला महागडा ठरलेल्या तुषार देशपांडेकडे जाण्याची गरज पडली नसती. तुम्ही एमएस धोनीकडून नेहमी अशा चुका करण्याची अपेक्षा करत नाहीत. मात्र, जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज समोर असेल, तेव्हा तुम्ही फिरकी गोलंदाजाचा वापर करून जोखीम आणि त्यानंतर बक्षीस घेऊ शकता.”
पुढे बोलताना सेहवाग म्हणाला की, “जेव्हा त्याने इम्पॅक्ट सब्स्टीट्यूट तुषार देशपांडेला नवीन चेंडू दिला, तेव्हा मी हैराण झालो. घरगुती क्रिकेटमध्ये तो नेहमी खेळाच्या नंतरच्या टप्प्यात गोलंदाजी करतो. मला वाटले की, कदाचित तो राजवर्धन हंगरगेकर याला नवीन चेंडू देऊ शकतो.”
देशपांडेचे षटक
तुषार देशपांडे याने 4 षटके गोलंदाजी करताना फक्त शुबमन गिल याची विकेट घेऊन 51 धावा खर्च केल्या. दुसरीकडे, मोईन अली याला एकही चेंडू टाकू दिला नाही. विशेष म्हणजे, हंगरगेकर याने पदार्पणाच्या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करत 36 धावा खर्च करून 3 विकेट्स नावावर केल्या. (legend virender sehwag on not using moeen ali as bowler said you cant expect this from ms dhoni ipl 2023 )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीच्या सामन्यापूर्वीच डिविलियर्सची भविष्यवाणी! ‘हे’ 4 संघ करतील प्ले-ऑफमध्ये एन्ट्री, MI बाहेरच
पावसाने बिघडवला केकेआरचा खेळ! पंजाबची डकवर्थ-लुईस नियमामुळे 7 धावांनी विजयी सलामी