तीन वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएलच्या १३ व्या हंगामात खास कामगिरी करताना दिसत नाही. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये केवळ ३ सामन्यात विजय मिळवला आहे, तर उर्वरित ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केला आहे. चेन्नई संघ ६ गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. कर्णधार एमएस धोनीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याच्या खराब कामगिरीवर पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी धोनीला सल्ला दिला आहे.
‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत मियाँदाद यांनी म्हटले की, “धोनी सध्या सामने खेळण्यासाठी फीट नाही. कारण तो खूप महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेट खेळत आहे. जर कोणी पूर्णपणे फीट नसेल, तर त्याचा खेळ सावकाश होईल. धोनीला यावेळी स्वत: शी चर्चा करण्याची आवश्यकता आहे.”
“धोनी विचार करून चांगल्याप्रकारे खेळू शकतो. जर तुम्हाला तुमच्या बुद्धीचा योग्य वापर कसा करायचा हे माहित असेल, तर वयदेखील तुम्हाला अडथळा ठरणार नाही,” असेही त्यांनी पुढे म्हटले.
धोनीला सल्ला देत मियाँदाद यांनी म्हटले की, “त्याने नेट्सवर व्यायाम आणि फलंदाजी सरावाची वेळ वाढवली पाहिजे. जर तो २० सिट- अप्स करत असेल, तर ते वाढवून त्याने ३० केले पाहिजेत. याबरोबरच जर तो नेट्सवर १ तास घालवत आहे, तर ते वाढवून त्याने २ तास केले पाहिजेत.”
जावेद मियाँदाद यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द दोन दशकांपेक्षा अधिक राहिली आहे. ते भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत संयुक्तरीत्या सर्वाधिक ६ वेळा आयसीसीचा विश्वचषक खेळणारे खेळाडू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचे स्टार खेळाडू किती कमाई करतात एकदा पहाच…
-चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स: पराभवानंतरही चेन्नईच्या खेळाडूंनी ‘हे’ विक्रम केले नावावर
-चक्क २० संघांकडून खेळलेला अष्टपैलू आज उतरणार चेन्नई सुपर किंग्सकडून मैदानात
ट्रेंडिंग लेख-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’