AB De Villiers Statement On IPL: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्सने 2021च्या हंगामानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती. डिव्हिलियर्स आपल्या 14 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत 2 संघांसाठी खेळला. आता त्याने आपल्या जुन्या आयपीएल संघ दिल्ली डेअरडेव्हिल्स (सध्याचे दिल्ली कॅपिटल्स) बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. एबीडी 2008-2010 पर्यंत दिल्ली फ्रँचायझीसाठी खेळला होता. त्याने मोठा खुलासा करताना सांगितले की, त्या दिवसांमध्ये मोठे स्टार क्रिकेटपटू असूनही दिल्ली संघाची अवस्था खूपच वाईट होती. (AB de Villiers Delhi Daredevils)
क्रिकेट डॉट कॉमसोबतच्या संवादात एबी डिव्हिलियर्सने सांगितले की, त्यावेळी संघात ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) आणि डॅनियल व्हिटोरी (Daniel Vettori) सारखे दिग्गज होते, परंतु, या संघाशी त्याच्या खूप वाईट आठवणी जोडलेल्या आहेत. त्याने हे देखील कबूल केले की, एक युवा खेळाडू म्हणून त्याला मोठ्या दिग्गजांची भीती वाटत असे.
एबी डिव्हिलियर्स म्हणाला, “मला तुम्हाला नावे द्यायची नाहीत. (अशा व्यक्तींची नावे सांगायला आवडणार नाही) मी एवढेच सांगू शकतो की दिल्ली डेअरडेव्हिल्सची अवस्था खूप वाईट होती, खरंच खूप वाईट होती. त्या संघात खूप ‘विषारी’ (toxic) माणसे होती.” त्याने हे देखील मान्य केले की, त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याला दिल्ली संघात फारसा पाठिंबा मिळाला नाही.
पुढे बोलताना तो म्हणाला, “दिल्ली संघात घालवलेली 3 वर्षे माझ्यासाठी फारशी चांगली नव्हती. या प्रवासात मला हे देखील जाणवले की, संघात खूप ‘वाईट’ (बेकार) लोक होते, मला त्यांची नावे घेण्याची गरज नाही. मला अपेक्षा होती, पण मोठ्या खेळाडूंनी मला तेवढा पाठिंबा दिला नाही.” (AB De Villiers Statement)
2011 मध्ये एबी डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये (RCB) सामील झाला आणि 2021 मध्ये निवृत्त होईपर्यंत आरसीबीसाठी खेळला. त्याने आपल्या 184 सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत 5,162 धावा केल्या, ज्यात त्याने 3 शतकांसह 40 अर्धशतके झळकावली. दिल्लीसाठी खेळताना त्याने 28 सामन्यांमध्ये 671 धावा केल्या, तर आरसीबीसाठी 156 सामन्यांमध्ये 4,491 धावा केल्या. (AB de Villiers IPL career)






