---Advertisement---

पाकिस्तानी खेळाडू यावर्षी भारतात क्रिकेट खेळणार? स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होणार विशेष सामना

On: शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022 1:13 PM
Sachin-Tendulkar-Shoaib-Akhtar
---Advertisement---

लिजेंड्स लीग क्रिकेट (एलएलसी)चा दुसरा हंगाम ६ भारतीय शहरांमध्ये खेळवला जाईल, ज्यामध्ये अनेक देशांचे खेळाडू सहभागी होतील. लीगचा पहिला हंगाम ओमानमध्ये या वर्षी जानेवारीमध्ये इंडिया महाराजा, वर्ल्ड जायंट्स और एशिया लायंस या तीन संघांमध्ये खेळला गेला. त्यात ७ सामने खेळले गेले. तथापि, दुसऱ्या हंगामात चार फ्रँचायझी-मालकीचे संघ असतील. कोलकाता, लखनौ, दिल्ली, जोधपूर, कटक आणि राजकोट या सहा शहरांमध्ये १७ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत १५ सामने खेळवले जातील.

गांगुलीने पुष्टी केली
भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही पुष्टी केली आहे की तो एलएलसीच्या एका अतिशय खास सामन्याला उपस्थित राहणार आहे. गांगुलीने इंस्टाग्रामवर लिहिले की, “स्वातंत्र्याच्या सणासाठी एक वेळ चॅरिटी फंडिंग मॅच खेळण्यासाठी तयार आहे. भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना आणि लिजेंड्स लीग क्रिकेटच्या सर्वोच्च दिग्गजांनी महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तथापि, आयोजकांपुढील सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना व्हिसा मिळणे, जे या स्पर्धेत भाग घेण्यास सज्ज आहेत. बीसीसीआय किंवा भारत सरकारने पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट संबंधांबाबत आपली भूमिका बदलली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.”

https://www.instagram.com/p/CgmM7PmtxH0/?utm_source=ig_web_copy_link

पाकिस्तानी खेळाडूही पाहता येतील
उल्लेखनीय म्हणजे, भारत आणि पाकिस्तानने जवळपास एक दशकापासून द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही आणि दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे ते फक्त आशिया कप आणि आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर येतात. २००८मधील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या पहिल्या सत्रानंतर पाकिस्तानी खेळाडू यात सहभागी झाले नाहीत. परिस्थितीबद्दल विचारले असता बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना व्हिसाबाबत फारशी माहिती नाही. अधिकाऱ्याने आयएएनएसला सांगितले आहे की, “मी जास्त काही सांगू शकत नाही. जर पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आमच्या सरकारकडून व्हिसा मिळाला तर ते खेळतील अन्यथा नाही. टूर्नामेंट किंवा व्हिसाच्या बाबतीत आमची (बीसीसीआय) कोणतीही भूमिका नाही.”

व्हिसा मिळणे कठीण
आणखी एका अधिकाऱ्याने प्रश्न केला आहे की, “पाकिस्तानशी आमचे कोणतेही क्रिकेट संबंध नसताना पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय भूमीवर खेळण्याची परवानगी कशी दिली जाऊ शकते. मला खात्री आहे की त्यांना व्हिसा मिळणार नाही. एलएलसीच्या २ हंगामात शोएब अख्तर, मिसबाह-उल हक, शाहिद आफ्रिदी आणि आशिया आणि वर्ल्ड इलेव्हन संघांसह इतर अनेकांसह माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंची लांबलचक यादी आहे. त्यामुळे व्हिसा देण्याबाबत भारत सरकार काय भूमिका घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की सर्व पाकिस्तानी क्रिकेटपटू, माजी आणि सध्याचे दोन्ही, ज्यांपैकी बरेच जण लीगमध्ये खेळत आहेत, ते काश्मीर प्रीमियर लीग (केपीएल)चे खंबीर समर्थक आणि प्रवर्तक आहेत. भारत सरकार आणि बीसीसीआयने केपीएलच्या संघटनेवर तीव्र आक्षेप घेतला आहे आणि निषेध केला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

धवनसोबत धोका? केएल राहुल परतल्याने कॅप्टन्सीवरून हाकालपट्टी, अपमानावर भडकले चाहते

स्लेजिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचे नवे रूप, श्रीलंकेला मदत करत जिंकली कोट्यवधी मने

वाद चिघळला! पंतच्या कमेंटवर उर्वशी रौतेलाचे प्रत्युत्तर; म्हणाली, ‘छोटू भैया, मी बदनाम व्हायला..’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---