---Advertisement---

धोनीप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आयपीएलआधीच थाला दिसणार ऍक्शनमध्ये? जाणून घ्या कुठे खेळणार

On: शुक्रवार, नोव्हेंबर 24, 2023 12:46 AM
MS Dhoni With LLC CEO Raman Raheja
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनी मैदानात उपस्थित नव्हता. धोनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला का आला नाही, असे प्रश्न चाहते विचारत आहेत. पण अशातच धोनीबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे.

सध्या लिजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धा सुरू आहे. 18 नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा सुरू झाली असून 9 डिसेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. तसे वनडे विश्वचषक संपल्यानंतर गुरुवारी (23 नोव्हेंबर) रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका देखील सुरू झाली. क्रिकेटच्या या रणधुमाळीत एमएस धोनी आणि एलएलसीचे सीईओ रमण रहेजा (Raman Raheja) एकत्र दिसले. सोशल मीडियावर धोनी आणि रहेजा यांचे एकत्र फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून धोनी येत्या दिवसांमध्ये एलएलसीमध्ये खेळणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

काही महिन्यांपूर्वीच रमण रहेजा यांनी माध्यमांसमोर धोनीबाबत खास प्रतिक्रिया दिली होती. रहेजा यांनी सांगितल्याप्रमाणे एमएस धोनी याने एलएलसीमध्ये खेळावे अशी त्यांची इच्छा आहे. तसेच येत्या काही वर्षांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी या स्पर्धेत सहभाग घेणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले होते. अशात गुरुवारी धोनीला भेटून त्यांनी चाहत्यांसाठी महत्वाचे संकेत एकप्रकारे दिले आहेत. आता धोनी एलएलसीमध्ये खेळण्याबाबत काय निर्णय घेणार, हे येत्या काळात पाहण्यासारखे असेल.

दरम्यान, डिसेंबर 2020 मध्ये धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त झाला. पण इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो अजून खेळत आहे. मागच्या वर्षी त्याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघ पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनला. आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेईल, असे अनेकांना वाटत होते. पण अद्याप त्याने असा निर्णय कळवला नाहीये. आगामी आयपीएल हंगामात देखील सीएसकेचे नेतृत्व करताना दिसेल, अशी पूर्ण शक्यता आहे. (Legends League Cricket Tournament CEO Rajan Raheja and MS Dhoni meet)

महत्वाच्या बातम्या – 
INDvsAUS । पहिल्याच टी-20 सामन्यात इंग्लिसचं वादळ! शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाची 208 धावांपर्यंत मजल
सूर्यकुमार बनला भारताचा 13वा टी-20 कर्णधार! ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतली गोलंदाजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---