---Advertisement---

VIDEO: पंतचा निराळा अंदाज, उमेश यादवच्या चेंडूवर जमिनीवर लोळत लगावला षटकार

---Advertisement---

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून लिसेस्टरशायर विरुद्ध भारत यांच्यात सराव सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ८ विकेट्स गमावत २४६ धावा केल्या होत्या. यामध्ये काही भारतीय खेळाडू लिसेस्टरशायरकडून खेळले आहेत. त्यामध्ये चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत (Rishabh Pant), प्रसिद्ध कृष्णा इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघ हा सामना झाल्यानंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात भारताचे दोन्ही यष्टीरक्षक-फलंदाज धडाकेबाज कामगिरी करत आहे. ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे.

या सराव सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज पंतची बॅट चांगलीच तळपली आहे. आकर्षक शॉट्स मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पंतची बॅट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शांत होती. त्याने पुन्हा एकदा लयीत येऊन भारताच्या आक्रमक गोलंदाजीवर चौफेर शॉट्स फटकारले आहेत. पंतने उमेश यादवला मारलेला हा षटकार ज्याप्रकारे मारला त्याची चर्चा सुरू आहे. त्याने स्कूप स्विच शॉट मारत सहा धावा मिळवल्या आहेत.पंतने पहिल्या डावात ७६ धावा करत टीकाकरांचे तोंड बंद केले आहेत. त्याने ८७ चेंडूत १४ चौकार आणि एक षटकार मारला. त्याने या सामन्यात ८७.३६च्या स्ट्राईक रेटने धावा करताना मारलेल्या त्या एका षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

भारताकडून खेळणाऱ्या यष्टीरक्षक-फलंदाज केएस भरतने पुन्हा एकदा चमकदार खेळी केली आहे. त्याने दुसऱ्या डावात ४३ धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारताचे प्रमुख फलंदाज बाद होत असताना त्याने एक टोक घट्ट पकडत नाबाद ७० धावा केल्या होत्या.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असता भारताने दुसऱ्या डावात ४ विकेट्स गमावत १६० धावा केल्या आहेत. त्यांनी १६२ धावांची आघाडी मिळवली आहे. या डावात नवदीप सैनी लिसेस्टरशायरकडून गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतल्या आहेत.

लिसेस्टरशायरचा पहिला डाव २४४ धावांवरच संपुष्टात आला. या डावामध्ये भारताच्या मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या आहेत.

हा सामना संपल्यावर भारतीय संघ एजबस्टन स्टेडियम, बर्मिंघम येथे १ ते ५ जुलै दरम्यान कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखालील पहिला विदेशी सामना असणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी२० आणि वनडे मालिका खेळणार आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

चाळीस वय व्हायच्या आधीच ‘या’ क्रिकेटपटूंचे झाले निधन, एकटा तर २२व्या वर्षीच गेला देवाघरी

फक्त कौतुकच करावं अशी ब्रायन लाराची ४०० धावांची अविस्मरणीय खेळी

भावानं नाद केलाय! टी२० ब्लास्टमध्ये झंझावाती फलंदाजी करत केवळ ‘इतक्या’ चेंडूत ठोकलंय शतक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---