वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज लेंडल सिमन्सने सोमवारी (१८ जुलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याआधी सोमवारीच वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज दिनेश रामदिन याने तत्काळ प्रभावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या विश्वचषक विजेत्या संघातील दोन खेळाडूंनी एका दिवशी निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
https://twitter.com/TKRiders/status/1549071912126464000?t=kD0a2yMuZT10QlZcWEht9A&s=19
सिमन्सने वेस्ट इंडिजसाठी क्रिकेटच्या सर्व प्रकारात ३७६३ धावा केल्या आहेत. त्रिनिदाद येथे जन्मलेल्या सिमन्सने २००६ मध्ये वेस्ट इंडिजसाठी पदार्पण केले होते. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने २०१५ मध्ये वेस्ट इंडिजकडून शेवटचा वनडे सामना खेळला होता. यानंतर खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे तो संघाचा भाग नव्हता. त्याने वेस्ट इंडिजसाठी ६८ वनडे सामन्यांमध्ये ३१.५८ च्या सरासरीने १९५८ धावा केल्या. वनडे कारकिर्दीत त्याला केवळ दोनच शतके करता आली.
सिमन्सची कसोटी कारकीर्द फारशी चांगली नव्हती. त्याने २००९ मध्ये वेस्ट इंडिजसाठी पदार्पण केले. तर २०११ मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. त्याच्या दोन वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने फक्त ८ सामने खेळले. यादरम्यान सिमन्सने १७.३८ च्या सरासरीने २७८ धावा केल्या. मात्र, त्याची टी२० कारकीर्द त्यामानाने बरीच मोठी राहिली. वेस्ट इंडीजने जिंकलेल्या २०१२ व २०१६ टी२० विश्वचषक विजेता संघाचा तो भाग राहिला. २०१६ विश्वचषकात त्याने भारताविरुद्ध नाबाद खेळी करत संघाला अंतिम फेरीत पोहोचवले होते.
आयपीएलमध्येही कमावले नाव
सिमन्सने जगभरातील बऱ्याच टी२० लीगमध्ये खेळून नाव कमावले होते. मात्र, इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळत असताना त्याला विशेष ओळख मिळाली. मुंबईने जिंकलेल्या पहिल्या दोन विजेतेपदात त्याचा सिंहाचा वाटा होता. निवृत्तीनंतर तो लिजेंड लीगमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हा शुद्ध वेडेपणा! शतक पूर्ण होताच रिषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांना धरलं धारेवर, पाहा व्हिडिओ