काही दिवसांपूर्वी २०१९-२० चा रणजी हंगाम पार पडला. या हंगामातील अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाने बंगाल विरुद्ध पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे विजेतेपद मिळवले. मात्र आता या अंतिम सामन्यातील नवीन वाद समोर येत आहे. या अंतिम सामन्यादरम्यान वापरण्यात आलेली खेळपट्टी केवळ ४ दिवसात तयार करण्यात आली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बंगालचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी अंतिम सामन्याच्या पहिल्याच दिवशी तक्रार केली होती की गोलंदाजी करताना चेंडू खूप खाली राहत होते. तसेच या सामन्यासाठी नेमलेल्या तटस्त क्यूरेटरबद्दलही लाल यांनी तक्रार करताना म्हटले आहे की त्यांनी आणखी चांगले काम करायला हवे होते.
लाल म्हणाले, ‘सामन्याच्या १५ दिवस आधी तूम्ही क्येरेटरला पाठवायला पाहिजे.’
पण बीसीसीआयच्या नवीन नियमानुसार रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठीचे ठिकाण उपांत्य सामन्यानंतर घोषित होते. त्यामुळे खेळपट्टी बनवणारे क्युरेटर एल प्रशांत राव यांना ही खेळपट्टी बनवण्यासाठी केवळ ४ दिवसांचा वेळ मिळाला.
ट्रेटिंग घडामोडी –
–१२ पैकी १२ आयपीएलमध्ये सुरेश रैनाने धावांचा असा पाडला आहे पाऊस
–एकाचवेळी विरासह ७ खेळाडूंनी ट्विट करण्याचे कारणंही आहे तसंच मोठं
–जर आयपीएल झाली नाही तर या ५ खेळाडूंचं होणार सर्वाधिक नुकसान
–त्या खेळीने युवराजचे नाव अजरामर तर केलंच पण टीम इंडियाचं टेन्शनही दूर केलं
–भारतीयांसारखं क्रिकेटवर प्रेम जगात कुणीच करत नाही