क्रिकेटमध्ये बदलत्या काळानुसार क्रिकेट आणि क्रिकेटपटूंमध्ये खूप बदल झाले आहेत. तसेच आता क्रिकेट खेळताना देखील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. खेळाच्या शैलीत जसा बदल झाला आहे तसाच खेळाडूंच्या लूकमध्ये देखील खूप बदल झाला आहे.
याबरोबरच, क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या जर्सीपासून बरेच काही बदलले आहे. पण IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सकडून खेळलेल्या राहुल तेवतियाने चाहत्यांना 90 च्या दशकातील क्रिकेटची आठवण करून दिली. तसेच, राहुल तेवतिया हा या दिवसांमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये हरियाणाकडून खेळत आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये राहुल तेवतिया हरियाणाकडून खेळत असताना हरियाणा क्रिकेटने तेवतियाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो फलंदाजी करताना दिसत आहे. तसेच, यावेळी तेवतिया पांढऱ्या जर्सीत क्लीन शेव्ह करताना दिसत आहेत. त्याला फक्त मिशा आहेत. तर त्याने खास प्रकारची टोपी देखील घातली आहे.
तेवतियाचा हा लूक पाहून चाहत्यांना ९० च्या दशकातील क्रिकेटची आठवण झाली. यापूर्वी अनेकदा क्रिकेटर्स या लूकमध्ये दिसत होते. पण, तेवतियाचा हा लूक पाहण्यासारखा आहे. तेवतियाच्या या मनोरंजक लूकवर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलमध्ये राहुल तेवतिया गुजरात टायटन्सचा भाग होता.
Rahul Tewatia in new looks. 🔥 pic.twitter.com/2QProPrEn5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 11, 2024
यावेळी त्याने टूर्नामेंटमध्ये 17 सामने खेळले असून 10 डावात फलंदाजी करत त्याने फक्त 21.75 च्या सरासरीने 87 धावा केल्या. मात्र, या काळात त्याचा स्ट्राइक रेट 152.63 होता. याबरोबरच राहुल 2022 पासून गुजरात टायटन्सचा भाग असून त्याला टायटन्सने 2022 च्या मेगा लिलावात 9 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तसेच गुजरातने 2024 च्या आयपीएलसाठी तेवतियाला कायम ठेवले आहे.
दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) हंगामाची सुरुवात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. तर या हंगामात मार्क वुड लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळणार नाही. त्याच्या जागी वेस्ट इंडीजचा शमर जोसेफ संघासाठी गोलंदाजी करेल. जोसेफला खरेदी करण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्सने 3 कोटी रुपये मोजले आहेत. युवा कॅरेबियन गोलंदाजासाठी ही रक्कम नक्कीच मोठी आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या अधिकृत पेजवर याविषयी माहिती माहिती दिली गेली आहे.
महत्वाच्या बातम्या –
पुन्हा आलं ग्लेन मॅक्सवेल नावाचं तुफान, जबरदस्त स्ट्राईक रेटसह ठोकलं शतक, रोहित विक्रमाची बरोबरी
IND vs ENG : इंग्लंडला मोठा धक्का! संघातील मॅचविनर गोलंदाज कसोटी मालिकेतून बाहेर