सोमवारी (५ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल २०२० चा १९ वा सामना झाला. या सामन्यात दिल्लीने ५९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९६ धावा करत बेंगलोरला १९७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला ९ बाद १३७ धावाच करता आल्या.
या सामन्यादरम्यान दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने बेंगलोरचा सलामीवीर ऍरॉन फिंचला मंकडींग करण्याची चेतावणी दिली होती. ज्याबद्दल सध्या क्रिकेट वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. आता स्वत: अश्विननेच ती शेवटची चेतावणी असल्याचे सर्व फलंदाजांना ट्विट द्वारे सांगितले आहे.
अश्विनने ट्विट केले आहे की ‘आता हे स्पष्ट होऊन जाऊ दे. २०२० च्या हंगामातील ही पहिली आणि शेवटची चेतावणी होती. मी हे अधिकृतरित्या सांगत आहे. नंतर मला दोष देऊ नका.’ या ट्विटमध्ये अश्विनने दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगला टॅग केले आहे. तसेच त्याने पुढे असेही सांगितले की जरी त्याने फिंचला चेतावणी दिली असली तरी ते दोघे चांगले मित्र आहेत.
Let’s make it clear !! First and final warning for 2020. I am making it official and don’t blame me later on. @RickyPonting #runout #nonstriker @AaronFinch5 and I are good buddies btw.😂😂 #IPL2020
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) October 5, 2020
सामन्यात नक्की झाले काय?
या सामन्यात झाले असे की दिल्लीने दिलेल्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोर संघाकडून सलामीला देवदत्त पडिक्कल आणि ऍरॉन फिंच उतरले होते. यादरम्यान तिसऱ्या षटकात अश्विन गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथा चेंडू पडिक्कलला टाकण्यासाठी अश्विनने धाव घेतली. परंतु त्याचवेळी नॉन स्ट्राईकर एन्डला उभा असलेला फिंचने अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीज सोडली. ते पाहून अश्विनने तो चेंडू न टाकता आधी फिंचला समज दिली की जर त्याने पुढच्यावेळी चेंडू टाकण्याआधीच क्रिज सोडली तर तो त्याला मंकडींग करेल.
ICYMI – Ashwin warns Finch.
No, not this time. R Ashwin gives Aaron Finch a warning at the non-striker's end.https://t.co/50haslDf0v #Dream11IPL #RCBvDC
— IndianPremierLeague (@IPL) October 5, 2020
https://twitter.com/Cric_life59/status/1313154339246993417
https://twitter.com/yeswanth86/status/1313154391461883911
Ashwin got chance to out finch but he doesn’t 🙏
What he did in past to buttler in ipl ❤️
Gentlemen’s Game Cricket @ashwinravi99 @DelhiCapitals pic.twitter.com/cvSynPLaWB— Vasu chowdari (@BeliveYOLO) October 5, 2020
काय आहे नक्की वाद?
अश्विनचा दिल्ली कॅपिटल्ससाठी हा पहिला हंगाम आहे. यापूर्वी तो किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर होता आणि गेल्या आयपीएल हंगामात त्याने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद केले होते. बटलरला अशा प्रकारे बाद केल्याबद्दल त्याच्यावर टीका झाली होती. मंकडिंग बद्दलची चर्चा यावर्षी आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी देखील सुरू झाली होती. त्यावेळी रिकी पाँटिंगने म्हटले होते की, त्याने अश्विनला मंकडिंग पध्दतीने खेळाडूंना बाद करू नका असे सांगितले आहे.
रिकी पाँटिंगला इनसाइडर स्पोर्ट्सच्या शो ‘अम्स्ट्रेड फेस 2 फेस क्रिकेट सीरिज’मध्ये विचारले गेले होते की तो अश्विनला स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या अंतिम षटकात मंकडिंग पध्दतीने एखाद्याला बाद करण्याची परवानगी देईल काय? यावर रिकी पाँटिंगने हसत हसत सांगितले होते की, ‘मी अश्विनला शेवटचे षटक टाकू देणार नाही.’
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पुढे असे देखील म्हणाला, “आम्ही याबद्दल बोललो आहे. मी अश्विनला माझी इच्छा सांगितली आहे. मी त्याला सांगितले आहे की, अश्विनने मंकडिंग करावे असे मला वाटत नाही. हा नियम योग्य वाटत नाही. पंचाने हे सुनिश्चित केले पाहिजे की नॉन-स्ट्रायकर फलंदाज गोलंदाजीपूर्वी क्रीज सोडत नाही.”
तथापि, मंकडिंग हा खेळाचा एक साधा नियम आहे. तो पुढे म्हणाला होता की, ” मी या नियमामुळे खूश नाही. तथापि, मी एमसीसीशी समितीशी बांधिल आहे. पंचांनी या बाबतीत अधिक सावध असले पाहिजे आणि फलंदाज फसवणूक करत नाहीत हे पहावे.”