इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२मध्ये पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या लियाम लिविंगस्टोनने व्हायटालिटी टी२० ब्लास्टमध्येही तुफानी शॉट्स मारण्याचा क्रम सुरूच ठेवला आहे. तो या स्पर्धेत लंकाशायर संघाकडून खेळत आहे.
इंग्लंड आणि वेल्स येथे खेळल्या व्हायटालिटी टी२० ब्लास्ट या जाणाऱ्या स्पर्धेत लिविंगस्टोनने (Liam Livingstone) यॉर्कशायर विरुद्ध मारलेल्या गगनचूंबी षटकार मारला आहे. याचा व्हिडीओ व्हायटालिटी टी२० ब्लास्टने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.
ओल्ड ट्रेफॉर्ड स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात लिविंगस्टोनने मॅथ्यू रविसच्या १२व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हा षटकार मारला आहे. त्यावेळी चेंडू खूपच उंच आणि स्टेडियमपार गेला असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. यावरून त्याने आयपीएलमध्ये मारलेल्या षटकाराची आठवण आली. डाव्या हाताचा फलंदाज असलेला लिविंगस्टोनही स्वत:चा षटकार पाहून अंचबित झाला होता. त्याबरोबर समालोचकही हैराण झाले.
That. Is. Huge.
🔥 @liaml4893 🔥#Blast22 #RosesT20 pic.twitter.com/FAAaWKg85P
— Vitality Blast (@VitalityBlast) May 27, 2022
यॉर्कशायर विरुद्ध सामन्यात लिविंगस्टोनने जरी प्रेक्षकांना चांगले शॉट्स मारून आनंदीत केले असले तरी तो लवकरच बाद झाला. यावेळी त्याने १६ चेंडूमध्ये दोन चौकार आणि एक षटकारासह २३ धावा केल्या.
लिविंगस्टोनने २०२२ आयपीएल हंगामातील सर्वात लांब षटकार मारणारा फलंदाज हा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने गुजरात टायटन्स (३ मे) विरुद्ध मोहम्मद शमीच्या गोलदांजीवर (Longest Six) सोळाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर) ११७ मीटरचा षटकार मारला होता. या सामन्यात त्याने १० चेंडूत ३० धावा केल्या आणि हा सामना पंजाबने आठ विकेट्सने जिंकला.
साल २०१९च्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण करताना लिविंगस्टोन राजस्थान रॉयल्सकडून खेळला. त्याला २०२२च्या लिलावात पंजाबने ११.५० कोटी रूपयांमध्ये संघात विकत घेतले. पहिल्या दोन आयपीएल हंगामामध्ये लिविंगस्टोनला कमी संधी मिळाल्या. तर पंधराव्या आयपीएल हंगामात त्याने १४ सामन्यांमध्ये ३६.४२च्या सरासरीने ४३७ धावा केल्या आहेत.
व्हायटालिटी टी२० ब्लास्ट २०२२च्या हंगामात नॉर्थ गृपमध्ये नऊ आणि साऊथ गृपमध्ये नऊ असे एकूण १८ संघ खेळत आहे. या स्पर्धेचे हे २०वे हंगाम आहे. २००३मध्ये याचा पहिला हंगाम खेळला गेला होता.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL Final | गुजरात वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL फायनलच्या तिकीटाचे दर पाहून म्हणाल आपला टीव्हीच बरा
IPL च्या समारोपाची जंगी तयारी; मोदी, शहांच्या उपस्थितीत ‘हे’ सेलिब्रेटी करणार परफॉर्मन्स