टी-२० हा प्रकार सध्याच्या घडीला क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय असा प्रकार आहे. या प्रकारात मर्यादीत षटके असल्यामुळे फलंदाज संघासाठी जास्त धावा करण्यासाठी धडाकेबाज फलंदाजी करतो. काहीवेळेस फलंदाज आपल्या तुफानी फलंदाजीमुळे क्रिकेट रसिकांचे चांगलेच मनोरंजन करतात.
सध्या इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ या स्पर्धेनंतर टी-२० ब्लास्ट ही स्पर्धा चालू आहे. यादरम्यान इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टन याने या स्पर्धेतील एका सामन्यात एक अद्भुत असा षटकार लगावला आहे, जो आता चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या लिविंगस्टने ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत देखील आपल्या गगनचुंबी शॉटने क्रिकेट रसिकांचे मनोरंजन केले होते. असेच काहीसे त्याने टी-२० ब्लास्टमध्ये देखील केले आहे.
लिविंगस्टनने या सामन्यात लंकाशायर संघाकडून सलामीला खेळताना १० चेंडूंमध्ये २५ धावा केल्या. या छोट्याशा डावात देखील त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. यामध्ये त्याने ३ गगनाला भिडणारे षटकार लगावले. मात्र यातील लिविंगस्टनचा एक षटकार चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
लिविंगस्टनने ब्रुक्सच्या गोलंदाजीवर लेग साइडच्या दिशेने एक षटकार मारला. हा षटकार ठोकताना त्याने केवळ एकाच हाताचा वापर केला होता. त्यामुळे प्रथम दर्शनी हा शॉट पाहिल्यास चुकीचा शॉट मारल्याचे भासते. मात्र चेंडूने यशस्वीरित्या सीमारेषा पार केली. त्यामुळे त्याला हा शॉट खेळताना कोणतीही अडचण आली नाही. त्याच्या या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
The madman Liam Livingstone.pic.twitter.com/qAPOzmtSj2
— Johns. (@CricCrazyJohns) August 26, 2021
लिविंगस्टनने याआधीही पाकिस्तान विरुद्धच्या एका टी-२० सामन्यात असाच गगनाला भिडणारा एक षटकार लगावला होता. ज्यामुळे चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर गेला होता. लिविंगस्टनच्या त्या षटकारांची देखील जोरदार चर्चा झाली होती.
दरम्यान, लंकाशायर संघाने २० षटकांमध्ये ९ विकेटच्या बदल्यात १८४ धावा केल्या होत्या. याच्या उत्तरादाखल सोमरसेट या संघाने हे लक्ष्य केवळ १८.१ षटकांमध्येच पूर्ण केले. ज्यामध्ये टॉम लेमनबॉयने सर्वाधिक नाबाद ४७ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
–मन मे लड्डू फुटा! ड्वेन ब्रावोच्या सीपीएलमधील ‘अशा’ प्रदर्शनानंतर चेन्नई सुपर किंग्ज खूश
–ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मॅक्सवेल लवकरच बनणार ‘भारताचा जावई’, पाहा कोण आहे त्याची होणारी वधू?
–‘एकवेळ ४ आंतरराष्ट्रीय कर्णधार एकत्र खेळत होते,’ डू प्लेसिसने सांगितली सीएसकेची विशेषता