इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टोन याने गुरुवारी (1 डिसेंबर) पाकिस्तानविरुद्ध त्याचे कसोटी पदार्पण केले. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात लिविंगस्टोनला पहिल्यांदाच कसोटी फॉरमॅटमध्ये राष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पण तो हा सामना पूर्ण करू शकला नाही. दुखापतीच्या कारणास्तव त्याने या सामन्यात गोलंदाजी केली नाहीच, पण सोबतच तो या कसोटी मालिकेतून देखील बाहेर पडला.
इंग्लंड संघ तब्बल 17 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. असात या मालिकेचे महत्व अधिकच वाढले. मालिकेतील पहिला सामना रावलपिंडी याठिकाणी खेळला गेला. या सामन्यात लियाम लिविगस्टोन () इंग्लंड संघासाठी कसोटी पदार्पण करू शकला, पण त्याला दुखापतीला देकील सामोरे जावे लागेल. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली असून याच कारणास्तव त्याने मालिकेतून देखील माघार घेतली आहे.
उभय संघांतील या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लिविंगस्टोन दुखापत झाली. याच कारणास्तव तो पाकिस्तानच्या फलंदाजीवेळा मैदानात क्षेत्ररक्षण करतानाही दिसला नाही. पण जेव्हा इंग्लंड संघ दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी आला, तेव्हा लिविंगस्टोन 7 धावा करून नाबाद राहिला. असे असले तरी, दुखापतीमुळे तो खेळपट्टीवर अस्वस्थ दिसत होता. तत्पूर्वी सामन्याच्या पहिल्या डावात लिविंगस्टोनने 9 धावांची खेळी केली होती. मात्र फिरकीपटू लिविंगस्टोन या सामन्यात गोलंदाजी करू शकला नाही.
कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी (4 डिसेंबर) त्याच्या दुखापतीचे स्कॅन केले गेले. या स्कॅननंतर समजले की, दुखापत जास्त गंभीर आहे आणि अशा परिस्थितीत तो खेळू शकत नाही. आता तो मंगळवारी इंग्लंडचा माघारी येईल. इंग्लंड क्रिकेट संघाची मेडिलक टीम लिविंगस्टनोच्या दुखापतीवर उपचार आणि देखरेख ठेवेल. लिविंगस्टोन संघातून बाहेर पडला असला, तरी संघ व्यवस्थापनाने अद्याप त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली नाहीये.
उभय संघांतील पहिला सामना सोमवारी (5 डिसेंबर) इंग्लंडने नावावर केला. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 9 डिसेंबरपासून मुलतानमध्ये खेळला जाणार आहे, तर तिसरा कसोटी सामना 17 डिसेंबरपासून कराचीमध्ये खेळला जाणार आहे. (Liam Livingstone injured in Test debut, withdraws from Test series against Pakistan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिवंगत वॉर्नला मिळाला मानाचा पुरस्कार! क्रीडाक्षेत्रातील दिग्गजांच्या यादीत झाला समावेश
आईसलॅंड क्रिकेट बोर्डानेही उडवली पाकिस्तानची खिल्ली, रावळपिंडी सामन्याची तुलना थेट 2008च्या मंदीशी






