देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची रणजी ट्रॉफी स्पर्धा सध्या सुरू आहे. ग्रुप सी मधील गोवा संघासाठी अर्जुन तेंडुलकर याने मंगळवारी (13 डिसेंबर) रोजी रणजी पदार्पण केले. अर्जुनचा हा पहिला रणजी सामना असून यामध्ये त्याने शतक केले आहे. या शतकासह अर्जुन त्याचे वडील सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे दिसून आले.
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही 1988 मध्ये डिसेंबर महिन्यात रणजी पदार्पण केले होते. या रणजी पदार्पणाच्या सामन्यात सचिन तेंडुलकरने शतक केले होते. अशात आता अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) देखील वडिलांप्रमाणेच रणजी पदार्पणाच्या सामन्यात शतक करू शकला नाही. अर्जुनला देखील सचिनप्रमाणेच डिसेंबर महिन्यात रणजी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात अर्जुनने 2 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केले. संघासाठी तो 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करायला आला होता.
अर्जुन तेंडुलकर मागच्या रणजी हंगामापर्यंत मुंबई रणजी संघासोबत होता. मात्र, मुंबई संघात अर्जुनला पदार्पण करण्याची संधी मिळत नव्हती. याच कारणास्तव तो चालू हंगाम सुरू होण्यापूर्वी गोवा संघासोबत जोडला गेला. गोवा संघाने त्याला पदार्पणाची संधीही दिली आणि त्याने या संधीचे सोने देखील केले. पहिल्याच रणजी सामन्यात शतक केल्यामुळे नक्कीच त्याच्या आत्मविश्वासात देखील वाढ झाली असेल.
उभय संघांतील या सामन्यातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर गोवा प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्सच्या नुकसानावर 400 धावांचा टप्पा पार केला. सुयश प्रभुदेसाई हा देखील अर्जुनच्या साथीने या सामन्यात मोठी खेळी केली आणि शतक देखील पूर्ण केले. गोवा संघाचे सलामीवीर फलंदाज सुमीरान अमोनकर आणि अमोघ सुनील देसाई यांनी अनुक्रमे 9 आणि 27 धावांवर विकेट्स गमावल्यामुळे संघाला अपेक्षित सुरुवात मिळू शकली नाही. मात्र, नंतर सुयश प्रभुदेसाईने संघाचा डाव सांभाळला आणि मोठी धावसंख्या देखील करून दिली. (Like Sachin Tendulkar, Arjun Tendulkar scored a century on his Ranji debut)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीनंतर रिषभ पंतच करू शकलाय ‘अशी’ कामगिरी, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत झाला मोठा विक्रम
अवघ्या 15 वर्षांचं पोरगं गाजवणार आयपीएल लिलाव! अश्विनला मानतो आदर्श