युरोपियन फुटबॉल असोसिएशनने २०१७-१८च्या पुरूष प्लेयर ऑफ दी इयरची घोषणा केली आहे. यामध्ये बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीच्या नावाचा समावेश नाही.
जुवेंट्सचा क्रिस्तियानो रोनाल्डो, रियल माद्रिदचा लुका मोड्रिच आणि लीव्हरपूलचा मोहमद सलाह या तिघांची युरोने प्लेयर ऑफ दी इयर म्हणून निवड केली आहे.
✨ NOMINEES: UEFA Men's Player of the Year 2017/18 ✨
⭐️ @lukamodric10
⭐️ @Cristiano Ronaldo
⭐️ @MoSalah🗓️ #UEFAawards winners announced at the #UCLdraw, 30 August 🏆 pic.twitter.com/7lfkfaceve
— UEFA Champions League (@ChampionsLeague) August 20, 2018
मोड्रिच हा २०१८ फिफा विश्वचषकाचा गोल्डन बूट विजेता आहे. तर रोनाल्डोने रियलला सलग तीन वेळा आणि एकूण पाच वेळा युरो चॅम्पियन लीग चषक जिंकून दिला आहे. तसेच तो या लीगमधील सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू आहे त्याने १३ सामन्यात १५ गोल तर ३ असीस्ट केले आहेत.
Modrić. Ronaldo. Salah. 👌
Who deserves to be UEFA Men's Player of the Year 2017/18? 🤔🗓️ #UEFAawards winners announced at the #UCLdraw, 30 August 🏆 pic.twitter.com/mLOo7bTTOz
— UEFA Champions League (@ChampionsLeague) August 20, 2018
चॅम्पियन लीग उपविजेता लीव्हरपूलमध्ये येताच अनेक विक्रम तोडणाऱ्या सलाहने लीगच्या १३ सामन्यात १० गोल तर ५ असिस्ट केले आहेत.
या तिघांची निवड मागील हंगामाच्या चॅम्पियन लीग आणि युरोपा लीगच्या ८० प्रशिक्षकांनी मिळून केली आहे. तसेच यामध्ये ५५ पत्रकारांचाही समावेश होता जे या लीगचे सभासद होते. ३० ऑगस्टला याचा विजेता घोषित केला जाणार आहे.
तसेच युरोपा लीग जिंकणारा अॅटलेटिको माद्रिदचा अॅंटोनी ग्रीजमन हा चौथ्या स्थानावर तर मेस्सी पाचव्या स्थानावर आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहलीचा आजच्या दिवसातील ७वा मोठा पराक्रम
–बापरे! २०१४ला एका धावेसाठी झगडणाऱ्या विराटने २०१८ला केला अजब कारनामा