अर्जेंटिनाचा विश्वविजेता फुटबॉल कर्णधार लिओनेल मेस्सी याने आता पॅरिस सेंट जर्मन (PSG) संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तो आपला पूर्वीचा क्लब बार्सिलोना शसाठी खेळणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, तो करार पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आता मेस्सी अमेरिकेतील मेजर लीग सॉकर या स्पर्धेतील इंटर मियामी संघासाठी खेळताना दिसेल. स्वतः मेस्सीने ही घोषणा केली.
मेस्सी आणि पीएसजी यांच्यातील करार 30 जून रोजी समाप्त होत आहे. दोन वर्ष या संघासोबत राहिल्यानंतर हा करार पुढे वाढवण्यास मेस्सी इच्छुक नव्हता. तो आखाती देशांमध्ये खेळू शकतो असा अंदाज व्यक्त केला गेलेला. मात्र त्याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वीच तो आपला मूळ क्लब असलेल्या बार्सिलोनासाठी खेळण्याची आशा असल्याचे म्हटलेले. परंतु, या सर्वांच्या व्यतिरिक्त आता तो अमेरिकेत एमएसएल खेळताना दिसेल.
या संघासाठी खेळताना त्याने काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये लीगच्या प्रसारणातून येणाऱ्या रकमेतील काही वाटा त्याला देण्यात येईल. या करारात तो ब्रॅण्डिंग करत असलेल्या आदिदास कंपनीने देखील मोठी भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते.
(Lionel Messi Leaves PSG Set To Join MLS Club Inter Miami)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट